माल वाहतूकदारांचा संप : रेल्वे माल धक्क्यावर ३० हजार टन माल पडून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 12:49 PM2018-07-27T12:49:30+5:302018-07-27T12:51:06+5:30

कोट्यवधीची उलाढाल ठप्प

Due to the loss of freight traffic: 30 thousand tonnes of freight loading on rail freight | माल वाहतूकदारांचा संप : रेल्वे माल धक्क्यावर ३० हजार टन माल पडून

माल वाहतूकदारांचा संप : रेल्वे माल धक्क्यावर ३० हजार टन माल पडून

Next
ठळक मुद्देसिमेंट व रासायनिक खते पडूनमाल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवाना

जळगाव : गेल्या आठवडाभरापासून मालवाहतूकदारांनी बेमुदत संप पुकारल्यामुळे, जळगाव रेल्वे स्टेशनवरील मालधक्क्यावर३० हजार टन माल पडून आहे. यामुळे गुंतवणुकदारांची कोट्यवधीची उलाढाल ठप्प झाली आहे. स्टेशनवरील गोडावून मध्ये माल ठेवायला जागा नसल्याने, भाड्याने गोडाउनमध्ये माल ठेवण्याची वेळ आली आहे.
डिझेलच्या वाढलेल्या किंमती, ई-वे बिलातील जाचक अटी व इतर मागण्यासांठी २० जुलैपासून देशभरातील मालवाहतुकदारांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. यात जळगाव जिल्ह्यातील ५०० माल वाहतूकदार संपात सहभागी झाले आहेत. या संपामुळे दाणा बाजारात परराज्यातून येणाऱ्या मालाची आवक पूर्णपणे ठप्प झाली असून, दुसरीकडे रेल्वेने दररोज परराज्यातून येणारा विविध प्रकारचा माल, संपामुळे मालधक्क्यावरच पडून आहे. संपामुळे गुंतवणुकदारांचा कोट्यावधींचा माल अडकून पडल्याने, उद्योगधंदे थंडावले आहेत.
माल ठेवायला जागा नसल्याने पाळधीला रवाना
मालवाहतूक दारांच्या संपामुळे आधीच माल धक्क्यावर आठवडाभरापासून ३० हजार टन मालाचा साठा पडून असल्याने, दररोज मालगाडीने येणारा माल ठेवायला जागा नाही. यामुळे हा माल पाळधी येथे भाड्याने गोडावून घेऊन, गुरुवारपासून पाठविला जात आहे. शहरातील काही खासगी मालकांच्या ट्रकद्वारे या मालाची वाहतूक करण्यात येत असून, गोडावूनचे भाडे व वाहतूकीचा खर्च वाढल्याने, मालाची ने-आण करणाºया येथील ठेकेदाराला तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, माल धक्क्यावर मालगाडी आल्याने, १२ तासांच्या आत माल उतरविणे गरजेचे असल्याने, दररोज हजारो टन येणारा माल कुठे ठेवायचा हा प्रश्न ठेकेदाराला पडला आहे.
सिमेंट व रासायनिक खते पडून
जळगाव रेल्वे स्टेशनवरील माल धक्क्यावर मालगाडीने दररोज गुजराथ, चंद्रपूर, कर्नाटक, राजस्थान या भागातून सिमेंट, रासायनिक खते, मार्बल, फळे, भुसार माल, धान्य व औद्योगिक वसाहतीमधील विविध कंपन्यांचा कच्चा माल येत असतो. जळगाव मालधक्का वाहतुकीच्या दृष्टीने सोयीस्कर असल्याने जळगाव, धुळे व नंदुरबार येथील व्यापाºयांनी परराज्यातून मागवलेला हजारो टन माल या ठिकाणी येत असतो. जळगाव माल धक्क्यावर मालगाडी येताच, तासाभरात हा माल मालवाहतूकदारांच्या ट्रकद्वारे संंबंधीत व्यापाºयांकडे पाठविला जातो. मात्र, आठवडाभरापासून मालवाहतूक दारांच्या संपामुळे, हा माल माल धक्क्यावरच पडून आहे. दररोज चार ते पाच हजार टन माल येत असल्याने, आठवडाभरापासून सुमारे ३० हजार टन इतक्या मालाचा साठा झाला आहे.

मालवाहतूकदारांच्या संपामुळे माल धक्क्यावर ३० हजार टन मालाचा साठा झाल्यामुळे, गुजरातहून आलेल्या खतांच्या साठवणुकीसाठी जागा नाही. पाळधीला माल ठेवण्यासाठी गोदाम भाडयाने घेतले आहे. संप मिटेपर्यंत मालाची साठवणूक करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
-विजय पुरोहित, व्यवस्थापक, जळगाव रेल्वे मालधक्का हुंडेकरी असोसिएशन.

Web Title: Due to the loss of freight traffic: 30 thousand tonnes of freight loading on rail freight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.