पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करा; लंपी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

By सागर दुबे | Published: August 25, 2022 07:30 PM2022-08-25T19:30:14+5:302022-08-25T19:32:47+5:30

जळगाव जिल्ह्यात जनावरांमध्ये लंपी स्कीन आजाराची लक्षणे आढळली आहेत.

Due Lumpy Skin Disease, the Jalgaon District Collector appealed to the hive to worship the bulls in the cowshed | पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करा; लंपी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करा; लंपी स्कीन आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Next

जळगाव :  जळगाव जिल्ह्यातील रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरात लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवारी पशुपालकांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण आहे. मात्र, बैलांचे लंपी स्कीन या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण व्हावे, त्या आजाराची लागण होऊ नये, यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व पशुपालकांनी पोळा सण सार्वजनिकरित्या साजरा न करता बैलांची पूजा गोठ्यातच करुन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले आहे.

जळगाव जिल्हयातील सर्व पशुपालकांनी गाई, म्हशींमध्ये लंपी सदृश लक्षणे दिसून आल्यास जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा. लंपी स्कीन आजार संसर्गजन्य असला तरी रोगाचे निदान लवकर झाल्यास व लवकर योग्य उपचार सुरु केल्यास ८ ते १० दिवसात तो बरा होतो. तसेच जळगाव जिल्ह्यात उपचाराअंती रोग बरे होण्याचे प्रमाण ९९ टक्के आहे. त्यामुळे पशुपालकांनी घाबरून न जाता शासकीय यंत्रणेमार्फत उपचार करुन घ्यावे. त्यासोबतच गोठा स्वच्छता व गोचीड निमुर्लन पशुवैद्यकीय दवाखाने यांच्या सहकार्याने करुन घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.


 

Web Title: Due Lumpy Skin Disease, the Jalgaon District Collector appealed to the hive to worship the bulls in the cowshed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.