दीपनगरात बंद वीज संचांच्या देखभालीवर भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2017 11:26 AM2017-07-05T11:26:02+5:302017-07-05T11:26:02+5:30
वीजनिर्मितीकडे कंत्राटी कामगारांचे लागले डोळे, उपासमार सुरू
Next
ऑनलाईन लोकमत
भुसावळ ,दि.5- पावसाळ्यामुळे राज्यभरात विजेची मागणी घटली आहे, त्यामुळे अनेक ठिकाणचे वीजनिर्मिती संच बंद आहेत. यात दीपनगर वीजनिर्मिती केंद्रातील सर्वच संच बंद आहेत. त्यामुळे वीजनिर्मिती थांबली आहे. असे असलेतरी बंद वीज संचांची दुरुस्ती व देखभालीची कामे करण्यावर जास्त भर असल्याची माहिती दीपनगरातील अधिकृत सूत्रांनी दिली.
महाराष्ट्रातून विजेची मागणी घटली त्यामुळे दीपनगरातील सर्वच संच बंद आहेत. महाजेनकोच्या वीजनिर्मिती केंद्रात तयार होणा:या विजेचे दर जास्त आहेत. त्यामुळे कमी किमतीतील वीज खरेदीवर शासनाचा अधिक भर आहे. विशेष करून एनटीपीसी (नॅशनल थर्मल पॉवर स्टेशन) व खासगी वीज केंद्रातून वीज खरेदी केली जात आहे.
दीपनगरातील संच क्रमांक तीन दोन महिन्यांपूर्वीच लोड मॅनेजमेंट सेल व्यवस्थापनाने बंद करण्याचे आदेश दिले होते, त्यानुसार हा संच बंद करण्यात आला. या आधीच संच क्रमांक दोनही बंद आहे. आता संच क्रमांक पाच व चार एमओडीमध्ये असल्याने संच क्रमांक पाच बंद करण्याचे आदेश आहेत; तर संच क्रमांक चार हॅड्रोजन शुद्धतेसाठी बंद आहे. त्याचे ओव्हरऑयलिंग करण्यात येणार असल्याची माहिती दीपनगरचे मुख्य अभियंता आर.आर. बावस्कर यांनी दिली. पावसाळा सुरू झाला आहे. एरवी 20-22 हजार मेगाव्ॉट विजेची मागणी असलेल्या राज्याची आजची मंगळवारची मागणी 16 हजार 208 मेगाव्ॉट इतकी आहे. तर राज्याची वीजनिर्मिती 11 हजार 272 मेगाव्ॉट इतकी आहे. यात महाजेनकोची वीजनिर्मिती 4 हजार 31 मेगाव्ॉट इतकी आहे.