जळगावात ‘रिपाइं’ आठवले गटाचे धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 05:48 PM2018-03-26T17:48:34+5:302018-03-26T17:48:34+5:30
अॅट्रॉसिटी कायद्याचा फेरविचार करण्याची केली मागणी
आॅनलाईन लोकमत
जळगाव, दि.२६ : अॅट्रॉसिटी कायद्याच्या गैरवापराबाबत भाष्य करीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार व्हावा, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले गट) चे महानगराध्यक्ष अनिल अडकमोल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनही करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, या निर्णयामुळे अनुसूचित जाती, जमाती, आदिवासी या समाजात भय निर्माण झाले असून त्याचे दूरगामी परिणाम होतील. देशात, राज्यात अनुसूचीत जाती, जमाती, आदिवासींवर सर्वाधिक अन्याय, अत्याचार होतात. त्यामुळे राज्य सरकारने व केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करावी, अशी मागणी जिल्हाधिकाºयांकडे केली आहे. यावेळी प्रताप बनसोडे, दीपक सपकाळे, रमाबाई ढिवरे, सागर सपकाळे, उज्ज्वला अडकमोल, पूनम जोहरे, संतोष सोनवणे, दिलीप पाटील, अशफाक शेख, दिलीप अहिरे, संतोष इंगळे, आनंद गायकवाड, भिमराव बनसोडे, सुमन इंगळे यांच्यासह महिला व पुरूष उपस्थित होते.