खरीप अनुदान नसल्याने दुष्काळात तेरावा महिना!
By admin | Published: January 9, 2016 12:41 AM2016-01-09T00:41:09+5:302016-01-09T00:41:09+5:30
नंदुरबार : संपुर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असतांना केवळ तीन तालुक्यांसाठी 30 कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान आल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
नंदुरबार : संपुर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त असतांना केवळ तीन तालुक्यांसाठी 30 कोटी 62 लाख रुपयांचे अनुदान आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. यंदा सरासरीच्या 13 टक्के कमी पाऊस झाला आहे. शिवाय अनियमित पाऊस झाल्याने खरीपाचे उत्पादन निम्म्यावर आले. प्रशासनाने नजर अंदाज पैसेवारी संपुर्ण जिल्ह्यात 50 टक्केच्या आत जाहीर केली. नंतर तीन तालुके वगळले. सुधारीत पैसेवारीच्या आधारे प्रशासनाने 55 कोटी 47 लाख रुपयांची अनुदानाची मागणी केली. राज्य शासनाने मात्र केवळ 30 कोटी 62 लाख रुपयेच मंजूर केले. संपुर्ण जिल्ह्यातील शेतक:यांच्या खरीप हंगाम वाया गेला असतांना केवळ नंदुरबार, नवापूर आणि धडगाव तालुक्यातील शेतक:यांना लाभ मिळणार आहे. अन्य तीन तालुक्यांना वगळले आहे.