जातप्रमाणपत्र न दिल्याने दोन जि.प. सदस्य अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 12:19 PM2019-08-10T12:19:44+5:302019-08-10T12:20:29+5:30

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका: राजकीय वर्तुळात खळबळ

Due to non-caste certification, two jeeps Member ineligible | जातप्रमाणपत्र न दिल्याने दोन जि.प. सदस्य अपात्र

जातप्रमाणपत्र न दिल्याने दोन जि.प. सदस्य अपात्र

Next

जळगाव : जात वैधता प्रमाणपत्र मुदतीत सादर न केल्याने रावेर तालुक्यातील वाघोदा-विवरा जि.प. गटातील राष्टÑवादी काँगे्रेसचे सदस्य आत्माराम सुपडू कोळी (रा.विवर)े व हतनूर-तळवेल (ता. भुसावळ)गटातील शिवसेनेच्या सदस्या सरला सुनिल कोळी यांना सदस्य पदावरून अपात्र करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी शुक्रवारी हा निर्णय दिला.
पाल ता. रावेर येथील गोमती सिताराम बारेला यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिलेल्या तक्रारीत वाघोदा-विवरे जि.प. गटातील सदस्य आत्माराम सुपडू कोळी यांनी निवडून आल्यापासून सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर केले नाही. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे झालेल्या सुनावणीत कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र हे जात वैधता समितीकडे प्रलंबित आहे. त्यामुळे दाखल करता आलेले नसल्याचे सांगितले. यावर जिल्हाधिकाºयांनी कोळी यांना सदस्य पदावरून अपात्र ठरविले.
प्रकाश रामचंद्र मोरे रा.सुसरी ता.भुसावळ यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हतनूर-तळवेल गटातील अनुसुचित जमाती स्त्री राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या सरला कोळी यांनी जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याची तक्रार केली होती. त्यावर सरला कोळी यांनी बाजू मांडताना जात वैधता समितीने जात प्रमाणपत्र १५ नोव्हेंबर २०१८ रोजी एकतर्फी निकाल देऊन अवैध ठरविले. त्याविरूद्ध उच्च न्यायालयात अपिल केले असून त्यावर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे त्याचा निकाल लागेपर्यंत जिल्हाधिकाºयांकडील सुनावणी तहकूब करावी, अशी मागणी केली. मात्र ती मागणी फेटाळत कोळी यांनाही अपात्र ठरविण्यात आले, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयातील विधी अधिकारी अ‍ॅड.हरूल देवरे यांनी दिली.

Web Title: Due to non-caste certification, two jeeps Member ineligible

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.