डिझेलचे पैसे न भरल्याने जळगाव जिल्ह्यात एस.टी.ची चाके थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 12:42 PM2019-10-17T12:42:11+5:302019-10-17T12:42:37+5:30
्र्र जळगाव/अमळनेर/रावेर : मंगळवारी रात्रीही डिझेल संपले, ऐन सणासुदीत प्रवाशांची गैरसोय लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : वेळेवर पैसे न ...
्र्रजळगाव/अमळनेर/रावेर : मंगळवारी रात्रीही डिझेल संपले, ऐन सणासुदीत प्रवाशांची गैरसोय
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : वेळेवर पैसे न भरल्याने कंपनीकडून डिझेलचा पुरवठा बंद झाला. त्याचा परिणाम म्हणून एस.टी.बसेसची चाके जागेवरच थांबल्याचा प्रकार पुन्हा उघड झाला आहे.
दरम्यान, ऐन सणासुदीत एस.टी.थांबल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे. जिल्ह्यात रावेर आणि अमळनेर येथे हा बुधवारी हा प्रकार घडला.
गेल्या आठवड्यातही डिझेल संपल्यामुळे जळगाव आगारात प्रवाशांना ताटकळावे लागले होते. आता मंगळवारी रात्री पुन्हा डिझेल संपल्याचा प्रकार घडला.
उत्पन्न वाढूनही डिझेल खरेदीसाठी तारेवरची कसरत
जिल्ह्यातील आगारांच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. एवढे असूनही डिझेलसाठी वेळेवर पैसे भरले जात नसल्याची स्थिती आहे. गेल्या काही दिवसात डिझेल खरेदी करण्यासाठी संबंधित आगारांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
आधी पैस भरा, तरच टँकर पाठवू
करार नाम्यानुसार आगाराने एक दिवस आधीच डिझेलचे पैसे कंपनीकडे जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांमध्ये काही आगार प्रशासनातर्फे एक दिवस आधी पैसे जमा करण्यात आले नाही. डिझेल संपल्यानंतर पैसे जमा झाले. यावेळी आगार प्रशासनातर्फे संबंधित कंपनीकडे तात्काळ टँकर पाठविण्याची विनंती करण्यात आली. यावर कंपनी अधिकाऱ्यांनी एक दिवस आधीच पैस भरा, तरच टॅँकर पाठवू,असे कळविले.
रावेर व अमळनेरातील बसेस जागेवरच उभ्या
आठवडाभरात दोनदा जळगाव आगारात डिझेल संपल्यानंतर बुधवारी रावेर व अमळनेर येथील आगारांमध्ये हा प्रकार घडला. रावेरला तर मंगळवारी दुपारपासून डिझेल संपल्याने दीडशे फेºया रद्द झाल्या आणि साडेपाच लाखांचे नुकसान झाले. तर अमळनेरलाही तीन दिवसापासून डिझेल नसल्यामुळे ८० टक्के फेºया रद्द करण्यात आल्या. यामुळे तीन दिवसात सात लाखांचे उत्पन्न बुडाले असल्याचे आगार व्यवस्थापक अर्चना भदाणे यांनी सांगितले.
डिझेलसाठी संबंधित कंपनीच्या खात्यावर एक दिवस आधीच पैशांचा भरणा करण्यात येतो. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे भरणा करण्यास अडचणी येत आहेत. या संदर्भात कंपनीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच हा प्रश्न सुटेल, अशी अपेक्षा आहे.
-राजेंद्र देवरे, विभाग नियंत्रक, जळगाव.