मंत्र्यांच्या वाहनांना अडसर ठरल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ४ वृक्षांवर कुºहाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2017 11:09 AM2017-12-08T11:09:23+5:302017-12-08T11:12:07+5:30

सर्वसामान्य नागरिकांवर वृक्षतोड केल्यानंतर कारवाईचा बडगा उगारणारी मनपा याप्रकरणी काय कारवाई करणार याकडे लक्ष

Due to obstruction of minister vehicles, four trees in Jalgaon District Collector's house have been arrested | मंत्र्यांच्या वाहनांना अडसर ठरल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ४ वृक्षांवर कुºहाड

मंत्र्यांच्या वाहनांना अडसर ठरल्याने जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात ४ वृक्षांवर कुºहाड

Next
ठळक मुद्देदोन-तीन महिन्यांनी येणाºया मंत्र्यांच्या वाहनांना पार्र्किंगसाठी नडत असल्याने झाली वृक्षतोडनियोजन भवनसमोरील ४ सुबाभूळची डेरेदार झाडे तोडण्यात आलीव्हीआयपींसाठी वृक्षतोड होणार असल्याने सर्वसामान्यांमध्ये वृक्षप्रेम प्रशासन कसे जागृत करणार

आॅनलाईन लोकमत
जळगाव,दि.८ :जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील नियोजन भवनसमोर असलेली चार हिरवीगार झाडे केवळ बैठकीसाठी दोन-तीन महिन्यांनी येणाºया मंत्र्यांच्या वाहनांना पार्र्किंगसाठी नडत असल्याने गुरुवारी तोडून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला. एकीकडे सर्वसामान्य नागरिकांना वृक्षतोड केल्यास कारवाईचा बडगा उगारणारी मनपा याप्रकरणी काय कारवाई करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नियोजन भवनसमोर सुबाभूळची चार डेरेदार झाडे होती. मात्र नियोजन भवनमध्ये नेहमीच बैठका, कार्यक्रम होत असतात. मंत्र्यांच्या आढावा बैठका होतात. त्या वेळी व्हीआयपींची वाहने उभी करण्यास अडथळा होत होता. सोमवार, ४ रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली. या वेळी या ठिकाणी वाहनांची कोंडी झाली होती. त्यामुळे ही झाडे तोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार गुरुवार,७ रोजी नियोजन भवनसमोरील ४ सुबाभूळची डेरेदार झाडे तोडण्यात आली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातच एनआयसी कार्यालयाजवळील दोन झाडेही तोडण्यात आली. मात्र ही सुबाभूळची झाडे असल्याने परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात आले. एकीकडे शासनाच्या योजनांनुसार वृक्ष लागवडीचे आवाहन करणारे जिल्हा प्रशासन केवळ व्हीआयपींचे वाहन नियोजन भवनपासून जवळ उभे करता यावे यासाठी वृक्षतोड करीत असेल तर सर्वसामान्यांना वृक्ष लागवडीसाठी कसे प्रवृत्त करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

 सुबाभूळच्या झाडांना तोडण्यासाठी परवानगीची गरज नसते. त्यामुळे माझ्या आदेशाने ही झाडे तोडण्यात आली.
-किशोर राजे निंबाळकर, जिल्हाधिकारी.

Web Title: Due to obstruction of minister vehicles, four trees in Jalgaon District Collector's house have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव