अर्धवट कामामुळे वाहनधारकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:58 PM2019-06-22T12:58:47+5:302019-06-22T12:59:13+5:30
लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय ...
लेंडी नाल्याचे काम पूर्ण झाले असले तरी पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम प्रशासनाने अर्धवटच सोडले आहे. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत आहे. दरवर्षी पावसाळ््यात कांचनगरातील चौगुले प्लॉट समोरील, या लेंडी नाल्याच्या पुलावरुन पाणी वाहायचे. या पुलाची उंची अत्यंत कमी असल्यामुळे, पाऊस पडल्यावर काही वेळातच पुलावरुन पाणी व्हायला सुरुवात व्हायची. यामुळे पुलावरील पाणी कमी होईपर्यंत, वाहतूक ठप्प होत असे. यासाठी महापालिकेतर्फे नुकताच या नाल्यावर दहा ते बारा फुट उंचीचा पूल बांधण्यात आला आहे. सध्या पूलाचे काम पूर्ण झाले असून, दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम मात्र अपूर्ण आहे. मनपा प्रशासनाने पुलाच्या उभारणीनंतर लगेच या रस्त्यावर काँक्रीटीकरणाचे काम करायला हवे होते. मात्र, मुरुम टाकून तात्पुरता रस्ता तयार केला आहे. टाकलेला हा मुरुम पावसाळ््यात वाहून जाण्याची शक्यता आहे. तसेच या रस्त्यावर पावसाळ््यात खड्डेदेखील पडण्याची शक्यता आहे. सध्या शिवाजीनगर उड्डाणपूलाचे काम सुरु असल्यामुळे, शिवाजीनगरातील नागरिक या मार्गेच वापर करत आहेत. यामुळे या पुलावर सकाळपासूनच वाहनांची वर्दळ वाढत आहे. वाहनांची वर्दळ लक्षात घेता, प्रशासनाने मुरुम टाकण्याऐवजी काँक्रिटीकरणाचा रस्ताच करायला हवा. कदाचित पुलाच्या दोन्ही बाजूला टाकलेला मुरुमाचा भराव वाहून गेला तर, पावसाळ््यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर हाल होतील. तसेच यावेळी कॉक्रीटीकरणाचेदेखील काम करता येणार नाही. त्यामुळे मनपा प्रशासनाने संभाव्य धोके लक्षात घेऊन, हा रस्ता पक्का तयार करणे गरजेचे आहे. त्यामुळे किमान हाल तरी थांबतील.
- सचिन पाटील, रहिवासी.