खरेदी केंद्रावर तूर खरेदीत दुजाभाव

By admin | Published: April 21, 2017 12:31 AM2017-04-21T00:31:08+5:302017-04-21T00:31:08+5:30

मुक्ताईनगर : काँग्रेसतर्फे कर्मचा:यांना घेराव, नुकसान टाळण्याची मागणी

Due to purchase of tur in the shopping center | खरेदी केंद्रावर तूर खरेदीत दुजाभाव

खरेदी केंद्रावर तूर खरेदीत दुजाभाव

Next

मुक्ताईनगर : गेल्या महिन्यापासून सुरू झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या तूर खरेदी केंद्रात तूर खरेदी करताना टोकनप्रमाणे खरेदी न करता व्यापारी व संचालक मंडळाशी लागेबांधे असलेल्यांनाच  तूर खरेदीसाठी अग्रक्रम दिला जात असल्याची तक्रार आल्याने तालुका काँग्रेसतर्फे खरेदी केंद्रावर जाऊन कर्मचा:यांना घेराव घालण्यात आला.   नेतृत्व जिल्हा काँग्रेस सरचिटणीस डॉ. जगदीश पाटील व प्रभाकर पाटील यांनी केले.
शेतकरी  हितासाठी शासनाने बोदवड कृउबा समितीच्या मुक्ताईनगर उप बाजारात तूर खरेदी केंद्र सुरू केले आहे. मात्र बाजार समितीच्या   उपबाजारातील तूर खरेदी केंद्रावर 15-15 दिवस ते एक महिना शेतकरी तूर घेऊन उभा असून ही त्याची तूर मोजली जात नाही. त्या ऐवजी मोठे व्यापारी व काही राजकीय पुढारी यांच्याकडील  तूर  मात्र परस्पर खरेदी होत असल्याचा आरोप शेतक:याकडून केला जात आहे या  होत असलेल्या दुजाभावमुळे शेतकरी आज कर्मचारी यांच्यात अनेक वादाच्या घटना घडल्या आहेत त्याचा अनुभव आजसुद्धा आला.  गुरुवारी सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान शेतक:यांना देण्यात आलेल्या  टोकन क्रमांकानुसार तूर मोजली जात नसल्याने शेतक:यांनी विरोध केला ही बाब  तालुका काँग्रेस पदाधिका:यांना कळताच काँग्रेसचे डॉ.जगदीश पाटील, प्रभाकर पाटील, काँग्रेस तालुका अध्यक्ष  यांच्यासह असंख्य कार्यकर्ते  खरेदी केंद्रावर  धडकले व   तूर खरेदीत दुजाभाव होत असल्याचे दिसून आले. त्यामुळे   केंद्र नेमके व्यापारी/राजकीय पुढा:यांसाठी की शेतक:यांसाठी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शेतक:यांची होत असलेली उपेक्षा थांबवावी व टोकन्या क्रमवारीनुसार तूर मोजावी अशी मागणी कॉँग्रेसतर्फे कर्मचा:यांना घेराव घालून करण्यात आली आहे. डॉ.जगदीश पाटील, प्रभाकर पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.
काँग्रेसचा आरोप चुकीचा आहे. अगदी रीतसर टोकन नुसार व शेतक:यांना प्राधान्य देऊनच तूर खरेदी केली जात आहे, विरोधकांनी राजकारण करू नये.
- निवृत्ती पाटील,
सभापती कृउबा समिती,बोदवड
तूर खरेदी करताना शेतक:यांना प्राधान्य व टोकन क्रमांकावर तूर खरेदी करणे आवश्यक असताना व्यापारी व पुढा:यांना प्राधान्य दिले जात आहे हे चुकीचे आहे,यात बदल झाला नाही तर काँग्रेस खरेदी केंद्रावर आंदोलन करेल.
- डॉ. जगदीश पाटील,
जिल्हा काँग्रेस सरचिटणीस

Web Title: Due to purchase of tur in the shopping center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.