जामठी येथे सुरू ट्रान्सफार्मर काढून नेल्याने ग्रामस्थ संतप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 09:50 PM2018-10-06T21:50:24+5:302018-10-06T21:51:24+5:30
सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
जामठी, ता.बोदवड, जि.जळगाव : येथे शेती शिवारातील सुरू असलेला ट्रान्स्फर १ आॅक्टोबर रोजी वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कुठलाही पूर्वसूचना न देता काढून नेला. हा ट्रान्स्फर सुरू असूनदेखील का काढून नेण्यात आला, असा सवाल येथील संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या सात ते आठ दिवसात विजेअभावी आमच्या शेतातील झालेल्या पिकांच्या नुकसानीला जबाबदार असलेल्या वीज वितरण कंपनीच्या कर्मचाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील शेतकरी दिवाणसिंग चांगो पाटील, गणेश वसंत गोरे, कस्तुराबाई हिरालाल तेली, साहेबराव जानवर पाटील, मंगलसिंग उत्तम सिंग पाटील, ज्ञानेश्वर दामू पाटील, शंकरसिंग गजराजसिंग ठाकूर या शेतकºयांनी केली आहे. याबाबतचे निवेदन शेतकºयांनी वीज कंपनी, बोदवड पोलीस ठाण्यात दिले आहे व संबंधितांवर कारवाईची मागणी केली आहे.
दरम्यान, शनिवारी सायंकाळी वीज वितरण कंपनीच्या वतीने येथील शेतकºयांसाठी ट्रान्स्वफर बसविण्यात आला. मात्र आमच्या शेतातील पिकांचे गेल्या आठवडेभरात झालेले नुकसान कोण भरून काढणार व दोषींवर काय कारवाई करणार, असा सवाल संतप्त शेतकºयांनी उपस्थित केला आहे.
हा ६३ केव्हीचा ट्रान्सफार्मर बंद पडण्याच्या मार्गावर होता व नेहमी डी.ओ. उडत होता. त्यामुळे त्याला बदलविण्याची गरज होती. यासाठी हा ट्रान्सफार्मर बदलविण्यात आला. तरीही त्याचा फेल होण्याचा रिपोर्ट कार्यालयात प्राप्त झाला आहे तर संबंधित कर्मचाºयावर कारवाईचा प्रश्नच येत नाही, असे वीज वितरण कंपनीच्या अधिकाºयांनी सांगितले.