पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 09:16 PM2019-02-23T21:16:25+5:302019-02-23T21:20:14+5:30

गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला. 

Due to the removal of water in the well, due to falling in the well, the death of the farmer | पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

पाणी काढताना तोल जावून विहिरीत पडल्याने शेतकºयाचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे  जळगाव जिल्ह्यातील मुसळी येथील घटना  गुरांसाठी काढत होते पाणी

जळगाव : गुरांसाठी विहिरीतून पाणी काढत असताना ठिबक नळीत पाय अडकून तोल गेल्याने गोरख जगन पाटील (३५) या तरुण शेतकºयाचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना मुसळी, ता.धरणगाव येथे शनिवारी दुपारी घडली. डोक्याला मार तसेच पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून पाटील यांचा मृत्यू झाला. 
सूत्रांनी दिलेली माहिती अशी की,  गोरख पाटील हे शनिवारी शेतात काम करीत असताना दुपारी गुरांना पाणी पाजण्यासाठी विहिरीजवळ आले. त्यांची विहीर सुमारे ४० फूट खोल आहे. वीज नसल्याने बादलीने पाणी काढताना बादलीला बांधलेल्या ठिबकच्या नळीत त्यांचा पाय अडकला आणि त्यातच तोल जावून ते बादलीसह विहिरीत पडले. विहिरीत दहा फूट पाणी होते त्यांना पोहता येत नसल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. 
आवाज येताच धावले गुराखी
गोरख यांचे कुटुंब दुसºया शेतात होते. पाटील विहिरीत पडल्याने आवाज झाला. त्यामुळे शेजारील शेतामध्ये गुरे चारणाºयांनी घटनास्थळी धाव घेतली. विहिरीत डोकावल्यावर त्यांचा मृतदेह आढळून आला. ग्रामस्थांनी त्यांचा मृतदेह बाहेर काढून जिल्हा रुग्णालयात आणला असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या पश्चात  आई- वडील, पत्नी, दोन मुले,  दोन भाऊ असा परिवार आहे.

Web Title: Due to the removal of water in the well, due to falling in the well, the death of the farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.