वाढत्या उन्हामुळे रक्ताचा झराही आटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2019 11:56 AM2019-05-26T11:56:19+5:302019-05-26T11:56:48+5:30

‘रक्तपेढी आपल्या दारी’तून रक्तसंकलनासाठी धडपड

Due to the rising sun, blood flow came out | वाढत्या उन्हामुळे रक्ताचा झराही आटला

वाढत्या उन्हामुळे रक्ताचा झराही आटला

Next

जळगाव : वाढत्या उन्हामुळे भीषण टंचाईचे दुर्भीक्ष उद््भविलेले असताना रक्ताचाही तुटवडा तीव्र होऊ लागला आहे. त्यामुळे रक्तपेढ्यांना मागणीच्या तुलनेत रक्त उपलब्ध करून देताना मोठी कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. सध्या मागणी दुप्पट झाली आहे तर रक्तदात्यांची संख्या निम्म्यापेक्षाही कमी झाली आहे. यावर उपाययोजना म्हणून शहरात ‘रक्तपेढी आपल्या दारी’ ही संकल्पना राबवून रक्तसंकलनासाठी धडपड केली जात आहे.
मागणी दुप्पट, साठा निम्म्यावर
एरव्ही दरवर्षी उन्हाळ््यामुळे रक्त साठ्यात घट होणे हा दरवर्षाचा अनुभव आहे. मात्र या वर्षी उन्हाची तीव्रता अधिकच वाढत असल्याने रक्तदान शिबिर जवळपास बंदच झाले आहे. त्यामुळे या वर्षी रक्ताचा तुटवटा अधिक जाणवत आहे. यामध्ये एरव्ही दररोज ९० ते १०० बाटल्या रक्ताची मागणी असताना त्या तुलनेत रक्तसाठा उपलब्ध होतो. मात्र सध्या ही मागणी दुप्पट झाली असताना साठा मात्र निम्म्यावर आला आहे. त्यामुळे हा ताळमेळ जुळत नसल्याने रक्तपेढी चालकांकडून जनजागृती केली जात आहे.
रक्त येईल कोठून
रक्ताचा मुख्य स्त्रोत तरुण वर्ग आहे, मात्र सध्या महाविद्यालयांना सुट्या असल्याने त्याचा मोठा परिणाम होत असल्याचे रक्तपेढीच्यावतीने सांगण्यात आले. या सोबतच लग्न सराईमुळे अनेक जण बाहेर गावी असल्याने रक्तदान शिबिरही होत नाही. सर्वात मोठा परिणाम या वर्षी झाला तो निवडणुकीमुळे. कार्यकर्ते निवडणुकीत अडकल्याने रक्तदानाकडे जवळपास पाठ फिरविल्याचेच यंदा रक्तसाठ्यात अधिक घट झाल्याचेही सांगण्यात आले.
‘बी पॉझिटीव्ह’ मिळेना
उन्हाळ््यामध्ये नियोजन करून शस्त्रक्रिया केल्या जातात. त्यामुळे या काळात अधिक रक्ताची गरज भासते. या शस्त्रक्रियांमध्ये ह्रदयाच्या शस्त्रक्रियेसाठीच एका जणास जवळपास १२ ते १३ रक्ताच्या पिशव्या लागतात. मात्र त्या प्रमाणात रक्त उपलब्ध होत नाही. यासोबतच इतरही शस्त्रक्रियांची संख्या अधिक असते. यंदाच्या रक्त साठ्याची उपलब्धता पाहता नेहमीपेक्षा ही संख्या निम्म्यापेक्षाही घटली आहे. नेहमी एकेका रक्तपेढीत १००च्या पुढे असणाऱ्या एक-एक रक्त गटाच्या पिशव्या सध्या एक-एक पिशवीवर तर मोजक्याच रक्तगटाच्या पिशव्या ३० ते ६० दरम्यान उपलब्ध आहेत. यात ‘बी पॉझिटिव्ह’ रक्तगटाचा अधिक तुटवडा असल्याचे रक्तपेढीच्यावतीने सांगण्यात आले. २५ मे रोजीचा साठा पाहिला तर इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीत ‘एबी निगेटीव्ह’, ‘ओ निगेटीव्ह’ यांची केवळ प्रत्येकी एक-एक पिशवी तर ‘ए निगेटीव्ह’च्याही दोनच पिशव्याउपलब्धहोत्या.यावरूनरक्ततुटवड्याचाअंदाजयेऊशकतो.
रक्तपेढी आपल्या दारी
रक्ताचा तुटवडा दिवसेंदिवस वाढतच असल्याने रक्तपेढ्यांकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यामध्ये इंडियन रेडक्रॉस सोसायटीच्या रक्तपेढीच्यावतीने ‘रक्तपेढी आपल्या दारी’ ही संकल्पना राबविली जात आहे. यामध्ये ज्यांना रक्तदानाची इच्छा असली तरी वेळेअभावी ते रक्तपेढीत जावू शकत नाही व एका ठिकाणी १० जण रक्तदाते असल्यास तेथे ‘मोबाईल डोनर व्हॅन’पाठवून रक्तसंकलन केले जाते. तसेच इतरही कोणी इच्छुक असल्यास त्यांना रक्तपेढीत आणून व रक्तदानानंतर पुन्हा त्यांना सोडण्यात येत आहे. या संकल्पनेमुळे दररोज किमान ८ ते १० बाटल्यांची संख्या वाढली असल्याचे सांगण्यात आले.

सध्या वाढत्या उन्हामुळे रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून गरजूंना रक्त उपलब्ध करून देताना मोठी कसरत होत आहे. त्यासाठी उपाययोजना केल्या जात आहे. नियमित रक्तदान केल्याने पक्षघात (पॅरालेसेस) तसेच ह्रदयविकाराचे प्रमाण ७० टक्क्याने कमी होते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे रक्तदानासाठी प्रत्येकाने पुढे आले पाहिजे.
- डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, रक्तपेढी चेअरमन, इंडियन रेडक्रॉस सोसायटी.

सध्या रक्ताची उपलब्धता कमी झाली आहे तर मागणी दुप्पट झाली आहे. त्यामुळे रक्ताचा मोठा तुटवडा भासत आहे. रक्तदानासाठी सर्वांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- भानुदास येवलेकर, आरोग्य विभाग प्रमुख, गोळवलकर रक्तपेढी.

Web Title: Due to the rising sun, blood flow came out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव