व्यापाऱ्यांच्या बंदमुळे दाणाबाजारातील १० कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:42 PM2019-06-22T12:42:30+5:302019-06-22T12:43:02+5:30

कृउबातील व्यापाऱ्यांच्या बंदला पाठिंबा

Due to the shut down of the traders, turnover of the 10-crore turnover of the sugarcane market has been postponed | व्यापाऱ्यांच्या बंदमुळे दाणाबाजारातील १० कोटींची उलाढाल ठप्प

व्यापाऱ्यांच्या बंदमुळे दाणाबाजारातील १० कोटींची उलाढाल ठप्प

Next

जळगाव : बाजार समितीमधील व्यापाºयांच्या बंदला पाठिंबा देत शुक्रवार, २१ जून रोजी दाणाबाजार असोसिएशनच्यावतीने एक दिवस बंद पाळून दाणाबाजार कडकडीत बंद ठेवण्यात आला. २०० व्यापाºयांनी पुकारलेल्या या बंदमुळे दाणाबाजारातील जवळपास १० कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली. बंद दरम्यान बाजार समिती व दाणाबाजारातील व्यापाºयांनी एकत्र येत घोषणाबाजी केली.
संरक्षण भिंत ८ जून रोजी पाडण्यात आल्यानंतर बाजार समितीमधील व्यापाºयांनी बंद पुकारला. त्यानंतर भिंत बांधण्याचे आश्वासन देण्यात आल्याने हा बंद मागे घेण्यात आला होता. मात्र बाजार समितीने आश्वासन न पाळल्यामुळे पुन्हा हा वाद उफाळून आला. पाडलेले बांधकाम पुन्हा बांधण्याचे विकासकांना आदेश दिल्यानंतर आठवडा उलटूहनही भिंत बांधण्यासंदर्भात कार्यवाही होत नसल्याने मार्केट यार्ड आडत असोसिएशनने सोमवारपासून पुन्हा बंद पुकारून आपले व्यवहार बंद ठेवले आहेत. या बंदच्या समर्थनार्थ दाणाबाजार असोसिएशनने पाठिंबा देत शुक्रवार, २१ रोजी दाणाबाजारातील सर्व दुकाने बंद ठेवली.
कडकडीत बंद
शुक्रवार सकाळपासूनच दाणाबाजारातील व्यापाºयांनी आपली दुकाने बंद ठेवली. जवळपास २०० व्यापाºयांनी कडकडीत बंद पाळत मार्केट यार्ड आडत असोसिएशनला पाठिंबा दिला, अशी माहिती असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली. सोबतच बाजार समितीमधील व्यापाºयांनी दाणाबाजारात येऊन सर्वांना बंदचे आवाहनही केले. या वेळी दोन्ही असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांनी घोषणा दिल्या.
उलाढाल ठप्प
दाणाबाजारात मीठापासून ते सर्वच प्रकारच्या १५०० वस्तू एकाच ठिकाणी मिळतात. त्यामुळे या ठिकाणी दररोज जळगाव जिल्ह्यासह मराठवाडा, विदर्भातील व्यापारी मोठ्या संख्येने वाहने घेऊन खरेदीसाठी येत असतात. यातून जवळपास १० कोटींची उलाढाल होते. मात्र शुक्रवारी बंदमुळे ही सर्व उलाढाल ठप्प झाली. बंदबाबत पूर्व सूचना देण्यात आल्याने जिल्ह्यासह इतर ठिकाणाहून खरेदीसाठी येणारे व्यापारी आले नाहीत.

Web Title: Due to the shut down of the traders, turnover of the 10-crore turnover of the sugarcane market has been postponed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव