वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यात 23 गावांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2017 12:34 PM2017-06-13T12:34:54+5:302017-06-13T12:34:54+5:30

सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तालुक्याला वादळी वा:यासह मान्सूनच्या पहिल्या पावसाने झोडपून काढल़े

Due to the storm, power supply of 23 villages in Muktainagar taluka is broken | वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यात 23 गावांचा वीजपुरवठा खंडित

वादळामुळे मुक्ताईनगर तालुक्यात 23 गावांचा वीजपुरवठा खंडित

Next
>ऑनलाईन लोकमत
मुक्ताईनगर,दि.13 -  सोमवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास तालुक्याला वादळी वा:यासह मान्सूनच्या पहिल्या पावसाने  झोडपून काढल़े यामुळे तालुक्यातील 23 गावांचा वीजपुरवठा खंडीत झाला आहे.
सोमवारी रात्री वादळामुळे नायगाव शिवारात काही शेतकयांच्या अवघ्या शेतातील पूर्ण केळीबागा आडव्या पडल्याने जबर नुकसान झाले आहे तर अंतुर्ली वीज उपकेंद्राचे मुख्य वीवाहिनी खांब पडल्याने 23 गावे रात्रीपासून अंधारात आहेत़
वादळी वा:यामुळे  एका-एका शेतात किमान चार हजार तर कमाल 12 हजार केळीची झाडे वादळाने आडवी पडली आहेत. तर अनेक शेतात कमी अधिक प्रमाणात केळी पीक वादळाच्या तडाख्यात सापडल़े
अनेक ठिकाणी रात्री साडेआठ ते साडेनऊ दरम्यान वादळी पाऊस सुरू होता यात नागरी वस्त्यांना सह शेती शिवारात वीज खांब पडलेत़ अनेक ठिकाणी घरांची पत्रे उडाली आहेत़ सुकळी येथील माध्यमिक शाळेच्या वर्ग खोल्यांची पत्रे उडाली़ रात्रीपासून अंतुर्ली 33 केव्ही वीज उपकेंद्राचा वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरातील 23 गावांचा वीजपुरवठा खंडित झाला़ 

Web Title: Due to the storm, power supply of 23 villages in Muktainagar taluka is broken

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.