टय़ूब लिकेजमुळे दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद

By admin | Published: June 14, 2017 12:59 PM2017-06-14T12:59:44+5:302017-06-14T12:59:44+5:30

सुरु होण्यासाठी किमान 48 तासापेक्षा अधिक काळ लागेल

Due to the tube leakage, the shut down of the set number five | टय़ूब लिकेजमुळे दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद

टय़ूब लिकेजमुळे दीपनगरातील संच क्रमांक पाच बंद

Next

ऑनलाईन लोकमत

भुसावळ, जि. जळगाव, दि. 14 - महाजनकोच्या दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील 500 मेगाव्ॉट क्षमतेचा संच क्रमांक पाच टय़ूब लिकेजमुळे बंद पडला असल्याची माहिती या केंद्राचे मुख्य अभियंता माधव कोठुके यांनी दिली. मंगळवारी मध्यरात्री 1.20 वाजता या संचाची टय़ूब अचानक लिकेज झाल्यामुळे हा संच तत्काळ बंद पडला. दरम्यान तो सुरु होण्यासाठी किमान 48 तासापेक्षा अधिक काळ लागेल,असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील वीजेची मागणी कमी झाली त्यामुळे महाजनकोच्या आदेशानुसार सोमवारी रात्री 12 वाजता दीपनगरातील संच क्रमांक तीन बंद करण्यात आला आहे. आता पुढील आदेश आल्यानंतरच तो सुरू करण्यात येईल,असे सूत्रांनी सांगितले. शासनाच्या पीआरएस रिझर्व सेट डाऊन योजनेअंतर्गत संच क्रमांक तीन बंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Due to the tube leakage, the shut down of the set number five

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.