पाणी प्रश्नावरुन कु:हाड ग्रामसभेत महिलांचा गोंधळ
By admin | Published: May 2, 2017 01:32 PM2017-05-02T13:32:26+5:302017-05-02T13:32:26+5:30
दारुबंदीचा ठराव : जि.प.सीईओ यांनी केली जलसाठय़ाची पाहणी
Next
कु:हाड ता. पाचोरा,दि.2- कु:हाड येथे कमी दाबाने आणि जंतू मिश्रीत गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने संतप्त महिला व नागरिकांनी ग्रामसभेत सरपंच अख्तर शेख व ग्रामसेवक पी.ए.चव्हाण यांना घेराव घातला
ग्राम सभा सुरु होताच पाण्याबाबत महिलांनी जाब विचारला. यावेळेस ग्रामसेवकांनी सांगीतले की, धरण क्षेत्रात विहीरीला पाणी नसल्यामुळे तात्पुरत्या पाणी पुरवठा योजनेसाठी बहुळा धरणात पाठपुरावा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. या उत्तरावर देखील ग्रामस्थांचे समाधान झाले नाही.
सभेत अतिक्रमण, दारुबंदी, ग्राम सुरक्षा दल याविषयांवर ठराव करण्यात आला. तथापी ही सभा वादळी व आक्रमक ठरली. यावेळेस महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. गोंधळातच ही सभा आटोपण्यात आली.
1 मे रोजी दुपारी 4 वाजता जि.प.चे मुख्य कार्यकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी भेट देत कु-हाड ला पाणी पुरवठा करणा-या म्हसाळा व वाकडी जलाशयांची पाहणी केली. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी संजय म्हसकर, पाणीपुरवठा जळगाव मुख्य कार्यकारी अधिकारी एस. बी. नरवाडे, गट विकास अधिकारी गणेश चौधरी, ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता एस एस पवार उपस्थित होते.