वडजीसह सहा गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 06:42 PM2019-07-16T18:42:46+5:302019-07-16T18:43:17+5:30

गिरणेतून बेसुमार वाळू उपसा : पाण्याची पातळी खालावली

Due to water supply of six villages with Dadaji threat | वडजीसह सहा गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

वडजीसह सहा गावांचा पाणीपुरवठा धोक्यात

Next


वडजी, ता. भडगाव : परिसरातील गिरणा पात्रातील वाळू उपशाने पाण्याची पातळी खालवत असून वडजीसह परिसराती सहा गावांचा पाणीपुरवठा यामुळे धोक्यात आला आहे.
गेल्या काही वर्षापासून पावसाअभावी गिरणा पट्टयात पाणीटंचाईचे सावट दिवसेंदिवस गडद होत असतांना यातच भर म्हणून वडजी, वाक व वडधे येथील गिरणा पात्रात बिनधास्त वाळू उपसा सुरू असल्याने गिरणा धरणातून सुटणारे आवर्तनातील पाणी वाळू अभावी जमीनीत न जिरता वाहून जाते. त्यामुळे वडजी, रोकडाफार्म, वडगाव -नालबंदी, रूपनगर, पळासखेडा, महिंदळे या गावांच्या पाणीपुरवठा करणाऱ्या विहीरीत लगेचच पाण्याचा ठणठणाट होत आहे.
गेल्या काही वर्षापासून वाक व वडधे गावांच्या हद्दीतील गिरणा पात्रातील वाळू मोठया प्रमाणात उपसली गेली आहे मात्र वडजी गावाच्या हद्दीत वडजी ग्रा.पं. व नागरिकांनी भविष्यात पाणीटंचाई होणार नाही यासाठी मोठ्या प्रमाणावर वाळू राखून ठेवली होती. यामुळे वडजी, वडगाव - नालबंदी, पळासखेडा, माहिंदळे या ग्रामपंचायतीच्या पाणीपुरवठा करणाºया विहिरींना गिरणा धरणातून सोडलेल्या आवर्तनानंतरही पुढचे आवर्तनापर्यंन्त बºयापैकी पाणी टिकून राहत असे. वाक व वडधे गावांच्या हद्दीतील नदीपात्रातील वाळू संपली असल्याने अवैद्य वाळूउपसा करणाऱ्यांचा मोर्चा आता वडजी हद्दीच्या नदीपात्रात वळला असुन हजारो ब्रास वाळू रात्रीचा फायदा उठवत नेली. १०ते १२ फुटापर्यंत वाळूचा उपसा झाल्याचे दिसून येत आहे.
यामुळे पाणीपुरवठा करणाºया विहिरीनी तळ गाठला आहे. तर गिरणा नदी भर पावसाळ्यात कोरडी झाल्याने साधे डबके देखील गिरणेला नसल्याने भर पावसाळ्यात पाणीटंचाईचे संकट या गावापुढे आ वासून उभे आहे.
महसूल विभागाचे दुर्लक्ष
अशाच प्रकारे सतत वाळूउपसा होत गेला तर लवकरच या सहा-सात गावांना सततच पाणीटंचाईच्या भीषण संकटाला समोर जावे लागेल. हजारो ब्रॉस वाळू उपसा होवून देखील महसुल विभाग सर्व अलबेल असल्याचे भासवत आहे. १० फुट खोलीपर्यंत मोठमोठे खड्डे पाडून गिरणा नदीचे वस्त्रहरण होत आहे. मात्र प्रशासनातर्फे ठोस अशा काही उपाययोजना होत नसल्याचे दिसून येते. एखाद वेळेसच थातूरमातूर क ारवाई होते. याची दखल घेवून लोकप्रतिनिधींनी हा प्रश्न उचलावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Web Title: Due to water supply of six villages with Dadaji threat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.