तरुणींसोबत पार्टी करणाºया संशयितांना न्यायालयातून परत नेल्याने संशयकल्लोळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2019 01:29 PM2019-01-02T13:29:50+5:302019-01-02T13:31:17+5:30
राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवरील पार्टी
Next
ठळक मुद्देतीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रात त्रुटी कशा?फार्महाऊस मालकावर कारवाई नाहीच
ज गाव : ममुराबाद रस्त्यावरील एका राजकीय नेत्याच्या फार्महाऊसवर महिलांचे बिभत्स नृत्य व दारु पार्टी करताना पकडण्यात आलेल्या सहा महिला व १८ पुरुष अशा २४ जणांना पोलिसांनी थर्टी फर्स्टच्या मध्यरात्री ताब्यात घेतले. कायदेशीर कारवाई करुन या सर्व संशयितांना मंगळवारी दुपारी बारा वाजता न्यायालयात आणण्यात आले. दोन तास थांबल्यानंतर या सर्वांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेण्यात आल्याने या प्रकरणात संशयकल्लोळ निर्माण झाला. दरम्यान, मंगळवारी दिवसभर यावर खल सुरु होता. तरीही कागदपत्रांमध्ये त्रुटी राहिल्याने आर्श्चय व्यक्त केले जात आहे. एका मंत्र्याच्या जवळच्या राजकीय नेत्याचा हा फॉर्महाऊस आहे. यात अनेक बडे मासे असल्याने दिवसभर वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले होते. सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांनी सोमवारी रात्री दोन वाजता ममुराबाद रस्त्यावरील शेतातील फार्महाऊसवर धाड टाकली होती. त्यात सहा तरुणींसह १८ पुरुष अशा एकूण २४ जणांना पकडून तालुका पोलीस स्टेशनला आणले. मंगळवारी या सर्वांना बारा वाजता न्यायालयात आणले. न्यायालय आवारातील आरोपी कक्षात संशयितांना दोन तास बसवून ठेवण्यात आले. न्यायाधीशांसमोर हजर न करताच या सर्वांना पुन्हा माघारी तालुका पोलीस ठाण्यात नेण्यात आले. पोलीस निरीक्षक किंवा जबाबदार अधिकारी न्यायालयात आलेच नाही तर दुसरीकडे राजकीय क्षेत्रातील दिग्गजांची गर्दी होत होती व त्यांच्याकडून सूत्र हलविण्याचे काम सुरु असल्याने या प्रकरणात अधिकच संशय बळावला होता.पोलीस अधिकाºयांच्या बैठकाआरोपींना न्यायालयातून पोलीस स्टेशनला नेल्यानंतर त्या दरम्यानच्या काळात पोलीस निरीक्षक दिलीप भागवत, सहायक पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक लोहीत मतानी यांच्याकडे दोन वेळा तर पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या दालनातही बैठका झाल्या. दुपारी व सायंकाळी उशिरापर्यंत बैठकांचे सत्र चालले. त्यानंतर पुन्हा आरोपींना न्यायालयात आणण्यात आले.राजकीय दबाब अन् प्रतिबंधात्मक कारवाईदिवसभराच्या घडामोडी पाहत या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड राजकीय दबाव आल्याची चर्चा होती. त्यामुळे या संशयितांवर गुन्हा दाखल न करता मुंबई पोलीस अॅक्टनुसार ११०, ११७ अन्वये कारवाई करण्यात आले. या कलमान्वये संशयितांना अटकही करता येत नाही, दंडात्मक कारवाई करुन त्यांची सुटका होते. राजकीय दबावातून प्रतिबंधात्मक कारवाईवर निभावण्यात आल्याची जोरदार चर्चा या प्रकरणात झाली. या दिवसभराच्या घडामोडीत पोलिसांचीही चांगलीच फरफट झाली.राजकीय नेते, पदाधिकाºयांची भागम्भागया कारवाईमुळे राजकीय नेते व काही पदाधिकाºयांची चांगलीच भागम्भाग झाली. मनपाचे विरोधी पक्ष नेते सुनील महाजन, नगरसेवक नितीन बरडे, माजी महापौर अशोक सपकाळे, बजरंग दलाचे ललित चौधरी यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने न्यायालयात व तेथून न्यायाधीशांच्या निवासस्थानाबाहेर आले होते. तेथून ते परत न्यायालयात आले होते. या साºया प्रक्रियेत सर्वांचीच भागम्भाग झाली.असा चालला चोर- पोलिसांचा खेळरात्री दोन वाजता संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर बारा वाजता न्यायालयात आणण्यात आले. त्यानंतर न्यायालयात हजर न करता सर्वांना पोलीस ठाण्यात नेण्यात आले. दुपारी साडे चार वाजता एका वाहनातून सर्वांना न्यायालयाकडे नेण्यात आले, मात्र रस्त्यातच जिल्हा क्रिडा संकुलाजवळ पोलीस वाहन थांबविण्यात आले. एक तास रस्त्यात थांबल्यानंतर या सर्वांना वैद्यकिय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तर दुसरीकडे संशयितांच्या दिमतीला वकीलांची फौज व त्यांचे राजकीय समर्थक न्यायालयात प्रतीक्षा करीत होते. अचानक या सर्वांना सायंकाळी साडे सात वाजता न्यायाधीशांच्या घरी नेण्यात आले. आरोपींची संख्या, माध्यमांच्या प्रतिनिधींचा ताफा व समर्थकांची गर्दी पाहता न्यायाधीशांनी घरी कामकाजास नकार देत सर्वांना न्यायालयातच नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार आठ वाजता पुन्हा आरोपींचे वाहन न्यायालयात आले. कागदपत्रांमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याचा प्रकार लक्षात आल्याने पोलिसांनीच आपल्या अधिकारात समजपत्र देऊन या सर्वांची सुटका केली व बुधवारी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश बजावले. फार्महाऊस मालकावर कारवाई नाहीचपोलिसांनी कारवाई करताना पक्षपातीपणा केल्याचा आरोप होत आहे. ज्या फार्म हाऊसवर हे बिभत्स नृत्य व दारु पार्टी सुरु होती, त्या फार्म हाऊसच्या मालकावर कोणतीच कारवाई पोलिसांनी केली नाही. बड्या राजकीय व्यक्तीचे हे फार्महाऊस असल्यानेच त्यांच्यावर कारवाई टाळण्यात आल्याची चर्चा आहे. अवैध धंदे व किरकोळ हातगाडी चालकांवर कारवाईचा बडगा उगारला जात असताना बड्या धेंड्यापुढे पोलीस नांग्या टाकत असल्याची टीका या घटनेमुळे होऊ लागली आहे. तीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रात त्रुटी कशा?कागदपत्रांमधील त्रुटीचा आधार घेत पोलिसांनीच आपल्या अधिकारात ताब्यात घेतलेल्या संशयितांना रात्री ९ वाजता सोडून दिले. अर्धी रात्र व संपूर्ण एक दिवस हातात असताना, शिवाय तीन आयपीएस अधिकारी असताना कागदपत्रांमध्ये त्रुटी कशा राहतात असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसभर पोलीस स्टेशन, न्यायालय व न्यायाधीश निवासस्थान असे आरोपींना फिरविल्यानंतर रात्री ९ वाजता कागदपत्रात त्रुटी राहिल्याचे उघड होणे म्हणजेच संशयाला जागा निर्माण झाली आहे.