भुसावळ येथे जुगार अड्ड्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2019 03:36 PM2019-01-05T15:36:37+5:302019-01-05T15:37:48+5:30
भुसावळ येथील आठवडे बाजार व खडका चौफुली भागात बाजारपेठ पोलिसांनी अचानक धाड टाकून कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई केली.
भुसावळ, जि.जळगाव : येथील आठवडे बाजार व खडका चौफुली भागात बाजारपेठ पोलिसांनी अचानक धाड टाकून कल्याण मटका जुगार खेळणाऱ्या चौघांविरुद्ध कारवाई केली. त्यांच्याजवळून जुगाराचे साहित्य व दोन हजार ५८० रुपये रोख जप्त केले.
पोलीस निरीक्षक देवीदास पवार यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ३ रोजी येथील आठवडे बाजार भागात संतोषी माता हॉल पाठीमागील एका टपरीमध्ये कल्याण मटका जुगार खेळ सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यावरून अचानक धाड टाकली. त्यात जुगार खेळणारे दोघे रवींद्र उर्फ रवी प्रल्हाद पाचपांडे (वय ४२, रा.खडका रोड, बजाज बिल्डिंगजवळ भुसावळ) व दादाराव महादू साळवे (रा.पंचशील नगर) यांना सट्टा जुगाराची साधने व एक हजार ८४० रुपयांसह ताब्यात घेतले. यातील तिसरा आरोपी योगेश जाधव हा फरार झाला.
याबाबत बाजारपेठ पोलिसात पो.कॉ.बापूराव बडगुजर यांनी फिर्याद दिली. त्यावरुन मुंबई जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ अ भा.दं.वि. कलम १०९ प्रमाणे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याशिवाय खडका रोडवरील हॉटेल बगीचा पाठीमागे जुगार खेळताना जितेंद्र प्रल्हाद चौधरी (वय ४३, रा.मनोज फ्लोअर मिल, रामदास वाडी, भुसावळ) याच्यावर कारवाई केली. आसिफ उर्फ इकबाल खान जाम मोहल्ला याच्या नावावर जुगार घेत होता. त्याच्याजवळून जुगाराचे साहित्य व ७४० रुपये रोख मिळून आले. याबाबत पो. कॉ. श्रीकृष्ण देशमुख यांनी फिर्याद दिली. त्यावरुन गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई पो.कॉ. माणिक सपकाळे, जयेंद्र पगारे, सुनील थोरात, श्रीकृष्ण देशमुख, समाधान पाटील यांनी केली. तपास पो.ना. सुनील थोरात व माणिक सपकाळे करीत आहे.