डंपर, टेम्पो एसटीचा तिहेरी अपघात

By admin | Published: February 23, 2017 12:48 AM2017-02-23T00:48:52+5:302017-02-23T00:48:52+5:30

महामार्गावरील घटना :वाहतुक कोंडी

Dumpper, Tempo ST Triple Accident | डंपर, टेम्पो एसटीचा तिहेरी अपघात

डंपर, टेम्पो एसटीचा तिहेरी अपघात

Next

जळगाव : राष्टÑीय महामार्गावर   वाहतुकीची कोंडीतील एस.टी.बसच्या मागे थांबलेल्या मालवाहू लहान टेम्पोवर मागून भरधाव वेगाने येणारे डंपर धडकले धडकल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजता घडली. या धडकेने टेम्पो समोर थांबलेल्या एस.टी.बसवर जावून आदळला. या विचित्र अपघात टेम्पो व एस.टी.बसचे नुकसान झाले. दरम्यान, अपघात झाल्यानंतर चालकाने रस्त्यात डंपर घेवून पळ काढला, त्यामुळे वाहतुकीची आणखीनच कोंडी झाली होती.   खोटे नगर थांब्याजवळ हा अपघात झाला.
खोटे नगर थांब्याजवळ उतारवर बुधवारी दुपारी वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या. खामगाव आगाराची बस धुळेकडे जात असलेली एस.टी.बसही या कोंडीत थांबली होती. या बसच्या मागे मालवाहू टेम्पो (क्र.एम.एम.१९ बी.एम.७८९) थांबलेला होता.
यावेळी मागून भरधाव वेगाने आलेले डंपर (क्र.एम.एच.१९ झेड २७६३) टेम्पोवर धडकले, त्यामुळे हा टेम्पो थेट बसवर आदळला. यात बसचे बंपर वाकून पत्रा फाटला. तर टेम्पोचेही रेडीयएटर, हेडलाईटचे नुकसान        झाले.
हा अपघात झाल्यानंतर डंपर चालक तेथून फरार झाला. दरम्यान, बस चालक सुनील नथ्थूसिंग रघुवंशी (रा.आकोट, ह.मु.खामगाव) यांनी तालुका पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली.डंपर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाद व वाहतुकीची कोंडी
या विचित्र अपघातामुळे महामार्गावर दोन्ही बाजुंनी वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी वाहनधारकांमध्ये वादही झाला होता. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून वाहतूक सुरळीत केली व दुपारी डंपर ताब्यात घेतले. बस चालक सुनील रघुवंशी, टेम्पो मालक विजय मंत्री, चालक मनोहर दामू सदावते (रा.टहाकळी, ता.धरणगाव) यांनी पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली. उपनिरीक्षक सुदर्शन आवारी तपास करीत आहे.
 

Web Title: Dumpper, Tempo ST Triple Accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.