रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या डोंगरावर दीड हजार सेवेकऱ्यांचा एकच स्वरात दुर्गा सप्तशती पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2018 04:03 PM2018-10-15T16:03:37+5:302018-10-15T16:04:19+5:30
कुसुंबा बुद्रूक येथे सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या जागृत देवस्थान श्री भवानी माता मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रमुख प.पू.श्री.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राष्ट्र कल्याणासाठी सोडलेल्या अब्ज चंडीयागाच्या संकल्पांतर्गत रावेर, यावल तालुक्यासह बºहाणपूर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे दीड हजार सेवेकºयांनी एकाच स्वर, सुर व तालात श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले.
रावेर, जि.जळगाव : तालुक्यातील कुसुंबा बुद्रूक येथे सातपुड्याच्या डोंगर रांगेत वसलेल्या जागृत देवस्थान श्री भवानी माता मंदिरात दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ भक्त परिवाराचे प्रमुख प.पू.श्री.गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी राष्ट्र कल्याणासाठी सोडलेल्या अब्ज चंडीयागाच्या संकल्पांतर्गत रावेर, यावल तालुक्यासह बºहाणपूर जिल्ह्यातून आलेल्या सुमारे दीड हजार सेवेकºयांनी एकाच स्वर, सुर व तालात श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण केले. यामुळे सातपुड्याच्या डोंगरदºयात एकच नवचैतन्य पसरले होते.
या वेळी नितीन पाटील यांनी उपस्थित सेवेकरी अबालवृद्ध महिला पुरूषांना श्री दुर्गा सप्तशती यांनी पाठाचे महत्त्व विशद केले, तर जळगावहून आलेल्या कासार यांनी श्री दुर्गा मातेच्या अलंकारांचे धार्मिक माहात्म्य विशद केले. यशस्वीतेसाठी कुसुंबा ग्रामस्थ व दुर्गाभक्तांनी परिश्रम घेतले.