प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाबाई मराठे व भाऊराव महाराज कदम यांची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 06:16 PM2019-05-17T18:16:43+5:302019-05-17T18:22:15+5:30
राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : राजमाता जिजाऊ माता संगोपन राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत प्रबोधनपर कीर्तन सोहळ्यासाठी मुक्ताईनगर येथील दुर्गाताई मराठे व हभप भाऊराव महाराज कदम यांची निवड करण्यात आली आहे.
श्री संत आदिशक्ती मुक्ताबाईच्या पालखी सोहळा दरम्यान मुक्काम दर मुक्कामाला राजमाता जिजाऊ माता संगोपन या राज्य शासनाच्या कुपोषणमुक्ती अभियानांतर्गत कुपोषण मुक्तीसाठी प्रबोधनपर कीर्तने करण्याचा शासनाचा मानस आहे. यासाठी राज्यातील पाच कीर्तनकारांची निवड करण्यात आली आहे. त्यात मुक्ताईनगर येथील नगरसेवक संतोष मराठे यांच्या पत्नी हरिभक्त पारायण दुर्गाताई मराठे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड १५ मे रोजी औरंगाबाद येथे घेण्यात आलेल्या विशेष कार्यशाळे दरम्यान करण्यात आली आहे. या समारंभाच्या अध्यक्षस्थानी राजमाता जिजाऊ मिशनच्या सुप्रभा अग्रवाल उपस्थित होत्या.
औरंगाबाद येथे राजमाता जिजाऊ माता संगोपन बालआरोग्य व पोषण मिशन या महाराष्ट्र शासनाच्या विभागांतर्गत राज्यातील कीर्तनकारांची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. मिशनच्या सुप्रभा अग्रवाल, डॉ.सुदाम, युनिसेफचे सल्लागार अशोक उतरान यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत नाशिक, जळगाव, परभणी, अकोला, औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार उपस्थित होते.
श्री संत मुक्ताई पालखी सोहळ्यात कुपोषण मुक्तीवर प्रबोधनासाठी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे खान्देशी विभागीय अध्यक्ष हभप भाऊराव महाराज पाटील, अखिल भारतीय वारकरी मंडळ महिला आघाडी जिल्हाध्यक्षा हभप दुर्गाबाई संतोष मराठे, बºहाणपूर येथील कीर्तनकार हभप मालती महाजन महाराज, मुक्ताईनगरचे हभप भाऊराव महाराज कदम, हभप प्राध्यापक सी.एस. पाटील या कीर्तनकारांची नियुक्ती औरंगाबाद येथील कार्यशाळेत करण्यात आली आहे करण्यात आली आहे.