गेल्या पाच वर्षात जिल्हाभरात १३८९ घरफोड्या, ३३६ खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 11:05 AM2019-02-20T11:05:57+5:302019-02-20T11:06:53+5:30

४९६६ चोऱ्या तर २७७ महिलांच्या सोनसाखळ्या लांबविल्या

During the last five years, 1389 burials and 336 murders took place in the district | गेल्या पाच वर्षात जिल्हाभरात १३८९ घरफोड्या, ३३६ खून

गेल्या पाच वर्षात जिल्हाभरात १३८९ घरफोड्या, ३३६ खून

Next
ठळक मुद्देतरीही परिक्षेत्रात जळगावच सरस


जळगाव : २०१४ ते २०१८ या पाच वर्षाच्या कालावधीत जळगाव जिल्ह्यात १ हजार ३८९ घरफोड्या झाल्या आहेत तर ४ हजार ९६६ चोºया झाल्या आहेत. याच कालावधीत ३३ खून झालेले असले तरी शंभर टक्केपेक्षाही जास्त गुन्हे उघडकीस आलेले आहेत. काही घटनांमध्ये पोलीस दलाला नियंत्रण मिळविता आले आहे, घरफोडीच्या घटनांमध्ये मात्र कमालीची वाढ झालेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात घरफोड्या होऊन देखील फक्त ३९० घरफोड्या उघड झालेल्या आहेत. गुन्ह्यातील वसुलीही नगण्यच आहे.
२०१४ या वर्षात खून, सदोष मनुष्यवध, बलात्कार, विनयभंग, दरोडा, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, सोनसाखळी चोरी, घरफोडी, दंगा, फसवणूक, ठकबाजी, सरकारी नोकरांवर हल्ला यासारखे ५ हजार ४३६ गुन्हे घडले तर ४ हजार ४३८ गुन्हे उघडकीस आले तर २०१८ मध्ये ५ हजार ९३ गुन्हे घडले तर ३ हजार ६८८ गुन्हे उघडकीस आले.
२०१७ च्या तुलनेत ५८३ गुन्हे २०१८ मध्ये वाढले. खून, दरोडा व फसवणूक यासारखे गुन्हे उघडकीस आणण्यात यंत्रणेला यश आले आहे.
तरीही परिक्षेत्रात जळगावच सरस
जळगाव जिल्ह्यात घरफोडी, चोरीचा आकडा मोठा आहे तर उघडकीस आणण्याचे प्रमाण नगण्य आहे. असे असले तरी नाशिक परिक्षेत्रात जळगाव जिल्ह्यातच सर्वाधिक गुन्हे उघडकीस आले असल्याचे पोलीस दप्तरी असलेल्या नोंदीत आढळून आले.
मोबाईल व दुचाकी चोरीचे प्रमाण वाढल्याने चोरीचा आकडा फुगलेला दिसून येत असल्याचा दावा पोलीस प्रशासनाकडून होत आहे. तरीही मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना आढळून येत आहे.
तंत्रज्ञानच ठरतेय आधार
गुन्ह्यांच्या पध्दती बदलल्या तशा गुन्हे उघडकीस आणणारे तंत्रज्ञानही विकसित झाले. जे गुन्हे उघडकीस आलेले आहेत ते मोबाईल, सीसीटीव्ही कॅमरे यासारख्या तंत्रज्ञानामुळेच उघड झाली. घरफोडी, खून, आॅनलाईन फसवणूक यासारख्या गुन्ह्यात त्याचा प्रभावी वापर झालेला आहे. पारंपारीक गुन्हे उघडकीस आणण्याची पध्दत आता लोप पावत चालली आहे, कि काम करण्याचीच मानसिकता बदलत चालली आहे, हे देखील एक कोडेच आहे. आॅनलाईन फसवणुकीचा आकडाही गेल्या काही दिवसात वाढला आहे.
अवैध धंद्यावर नियंत्रण
जिल्ह्यात गुन्ह्यांचा आकडा वाढलेला असताना दुसरीकडे सहा महिन्यात अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांना यश आले आहे. काही वर्षाच्या कार्यकाळावर प्रकाशझोत टाकला तर तत्कालिन पोलीस अधीक्षक संतोष रस्तोगी यांच्या काळात अवैध धंदे नियंत्रणात होते, मात्र पूर्णपणेही बंद नव्हते. त्यानंतर आता धंदे शंभर टक्के बंद नसले तरी अपवादात्मक परिस्थितीत लपूनछपून धंदे सुरु आहेत. अवैध धंद्याशी संबंधित इतक्या मोठ्या प्रमाणात अधिकारी व कर्मचाºयांना निंयत्रण कक्ष व मुख्यालयात जमा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

Web Title: During the last five years, 1389 burials and 336 murders took place in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.