यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात ४१ घरे पडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 12:54 PM2019-09-20T12:54:04+5:302019-09-20T12:54:27+5:30

आतापर्यंत पुराच्या पाण्यात ८ जण वाहून गेले

During the monsoon this year, 4 houses fell in Jalgaon district | यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात ४१ घरे पडली

यंदाच्या पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात ४१ घरे पडली

Next

जळगाव : यंदा पावसाने जोरदार हजेरी लावत सरासरीची शंभरी ओलांडली आहे. मात्र संततधार व जोरदार पावसामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ४१ पक्क्या व कच्च्या घरांची पूर्णत: पडझड झाली आहे. तर ३१९७ कच्च्या व पक्क्या घरांची पडझड होऊन नुकसान झाले आहे. तर पुराच्या पाण्यात वाहून ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
यंदा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली. त्यामुळे नदी-नाल्यांना पूर आले. या पुरामुळे तसेच संततधार पावसामुळे जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत ४१ घरांची पूर्णपणे पडझड झाली आहे. १४८२ पक्क्या घरांची तर १६९७ कच्च्या घरांची अंशत: पडझड झाली आहे.
पुन्हा अतिवृष्टीचा इशारा... जिल्ह्यात यंदा पावसाने सरासरीची शंभरी पार केली आहे. त्यामुळे नदी-नाले ओसंडून वाहत आहेत. अशी परिस्थिती असताना जिल्ह्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लहान-मोठे पूल, रस्ते पुराच्या पाण्यामुळे बाधीत झाले आहेत. तसेच रस्त्याच्या कडेची झाडे, विद्युत खांब व तारा धोकादायक अवस्थेत आहेत. नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

Web Title: During the monsoon this year, 4 houses fell in Jalgaon district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव