बापरे बाप...! वर्षभरात तळीरामांच्या पोटात पडली २१३४ टॅंकरभर दारु!   

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2023 04:49 PM2023-04-06T16:49:07+5:302023-04-06T16:49:25+5:30

जिल्ह्यात २ कोटी ५६ लाख लिटर मद्याचा खप : गतवर्षाच्या तुलनेत २५ लाख लिटरने वाढला दारुचा खप

During the year, 2134 tankers full of alcohol sale in jalgoan district | बापरे बाप...! वर्षभरात तळीरामांच्या पोटात पडली २१३४ टॅंकरभर दारु!   

बापरे बाप...! वर्षभरात तळीरामांच्या पोटात पडली २१३४ टॅंकरभर दारु!   

googlenewsNext

कुंदन पाटील

जळगाव : ‘एकच प्याला’ म्हणत दारु रिचवणाऱ्या जळगावकर जनतेचा हिशेब आता ‘बंपर’वर नव्हे तर टॅंकरवरच येऊन ठेपला आहे. गेल्या आर्थिक वर्षात जळगाव जिल्ह्यातील तळीरामांनी तब्बल २ कोटी ५६ लाख ८ हजार १०६ लिटर दारु रिचवल्याचे उघड झाले आहे. ‘देशी’च्या बाटलीत उतरणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असून ‘माईल्ड बिअर’चा घोट रिचविणारे अत्यल्प असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१२ हजार लिटर क्षमतेच्या टॅंकरच्या हिशेबात रिचवलेल्या मद्यसाठ्याची तुलना केल्यावर ही बाब स्पष्ट झाली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान मिळविलेल्या महसुलासह दारु विक्रीची आकडेमोड केली आहे. या आकडेमोडीचे गणित कोट्यवधी लिटरच्या मापात गेल्याने ‘एक्साईज’ची संगणक प्रणालीही झिंगायला लागली आहे. जिल्ह्यात १७ लाख १० हजाकर ३७३ मद्याच्या तर ४४ हजार ६०० जण बियरच्या प्रेमात आहेत.

नुतनीकरणातून २० कोटी
२०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी शासनाकडून जळगावच्या दारुबंदी विभागाला २१ कोटी ५३ लाखांचे उद्दीष्ट देण्यात आले होते. ३१ मार्च २०२३ रोजी स्थानिक प्रशासनाने परवाने नुतनीकरणातून तब्बल २० कोटी ५५ लाख ३१ हजार ९९२ रुपयांचा महसुल तिजोरीत टाकला आहे. तर जळगाव उपविभागातील १३ आस्थापनांनी दारु विक्रीसाठी परवाने नुतनीकरण केलेले नाहीत.

मैं हॅू ‘देशी’प्रेमी हो....
जिल्ह्यात १ एप्रिल २०२२ ते ३१ मार्च २०२३ दरम्यान ९४ लाख लिटरभर ‘देशी’दारुच्या पेल्यात तळीराम उतरले आहेत. त्यापाठोपाठ विदेशी, तीव्र बियर आणि सौम्य बियरचा आस्वाद घेणाऱ्यांची संख्या आहे.मोजक्याच ग्राहकांनी  गेल्या आर्थिक वर्षात ‘वाईन’चा पेला हातात घेतला आहे. वर्षभरात त्यांनी केवळ ८८ हजार ५४ लिटर वाईन रिचविली आहे.

२५ लाख लिटर जास्तीचा खप
२०२१-२२च्या तुलनेत २०२२-२३ या आर्थिक वर्षात २५ लाख ७५ हजार ९३२ लिटरने दारुचा खप वाढला आहे. याचाच अर्थ यंदा ग्राहकांनी ‘एकच प्याला’ची मर्यादा ओलांडली आहे.

‘गावठी’ तर हिशेबातच नाही...
दरम्यान, ही आकडेवारी, अधिकृत मद्यसाठ्याच्या विक्रीनंतर स्पष्ट झाली आहे. या आकडेवारी व्यतिरिक्त ‘गावठी’च्या ‘मग’मध्ये उतरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. तर बनावट दारुचाही जिल्ह्यात महापूर आहे. या महापुरातही असंख्य तळीराम आंघोळीला उतरत आहेत. त्यामुळे जिल्ह्याची लोकसंख्या ४५ लाखांवर असताना तळीरामांची संख्या २२ लाखांच्या घरात आहे.

गेल्या दोन आर्थिक वर्षात ग्राहकांनी रिचवलेली दारु (लिटरमध्ये)
प्रकार                -२०२१-२२                -    २०२२-२३
देशी        -         ९०२०५७०             -      ९५२८००८
विदेशी     -         ५१७८४७३              -    ५७९०८९०
सौम्य बियर-          ३२८४२२            -          ५८८१२०
तीव्र बियर   -       ३८२०७७१              -      ५०१७१५०
वाईन         -           ९२७३०                  -९६०७८

Web Title: During the year, 2134 tankers full of alcohol sale in jalgoan district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.