जागेच्या वादात बुजल्या गटारी

By admin | Published: July 9, 2017 01:15 AM2017-07-09T01:15:51+5:302017-07-09T01:15:51+5:30

औद्योगिक वसाहतीतील समस्या : सांडपाणी साचल्याने पसरली दुर्गंधी

Dusty storm in space | जागेच्या वादात बुजल्या गटारी

जागेच्या वादात बुजल्या गटारी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औद्योगिक वसाहतीतील एम़ सेक्टर भागातून  बाहेर जाणाºया सांडपाण्याच्या गटारी वसाहतीला लागूनच असलेल्या शेतातून काढल्याने शेतमालकांनी त्या बुजून टाकल्या आहेत़ जागेच्या मालकी हक्कावरून सुरू झालेल्या या वादामुळे या गटारींवरील खर्च वाया गेल्याचेच दिसत आहे़
   या गटारी बुजल्याने एम़ सेक्टर भागात साचत असलेल्या सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरली आहे़ त्याचा त्रास  उद्योजकांसह कामगारांनाही सहन करावा लागत आहे़ ही समस्या दीर्घकाळ राहिल्यास यातून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे़
गेल्या २० वर्षांच्या काळात पहिल्यांदा जळगाव औद्योगिक वसाहतीत रस्ते व गटारी होत आहेत़ उद्योजकांकडून मिळणाºया करातून ही विकास कामे केली जातात़ त्यामुळे या कामांमध्ये नियोजन व उत्कृष्टता असायला हवी होती, अशी अपेक्षा उद्योजकांमधून व्यक्त होत आहे़
काही महिन्यांपासून औद्योगिक वसाहतीत गटारी व रस्त्यांची कामे सुरू आहेत़ मात्र या कामांमध्ये व्यवस्थापन व उत्कृष्टता नसल्याची तक्रार उद्योजकांनी अनेकवेळा औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकाºयांकडे तोंडी व लेखी स्वरूपात केली आहे़ २१ एप्रिल रोजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही उद्योजकांनी आपल्या समस्या मांडल्या होत्या़ मात्र त्यानंतर चौकशीसाठी आलेल्या जिल्हाधिकाºयांपर्यंत महामंडळाच्या अधिकाºयांनी आमच्या समस्या पोहचूच दिल्या नसल्याचा संताप उद्योजकांनी व्यक्त केला आहे़
एम़ सेक्टर भागात गटारींचे काम करण्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे नियोजन न केल्याने गटारींना नैसर्गिक प्रवाह (स्लोप) मिळालेला नाही़ गटारी बांधकाम केलेल्या शेताच्या मालकांशी समन्वय न साधल्याने व कागदपत्रांची तपासणी करून कामे न केल्याने या कामावरील झालेला खर्च तृर्तास तरी वायाच गेल्याचे दिसत आहे़
वसाहतीत १६ किमी़ पर्यंतच्या गटारी उभारण्यात आल्या आहेत़ पाणी काढण्याची व गटारींमधील काडी-कचरा साफ करण्यासाठी चार ते पाच कर्मचाºयांची व्यवस्था केली असल्याचे औद्योगिक वसाहत कार्यालयाचे तत्कालीन उपअभियंता जयंत पवार यांनी सांगितले होते़  त्यानुसार नव्याने आलेल्या अधिकाºयांनी तात्पूर्ती आवश्यक कामे करीत असल्याचे सांगितले़
पावसामुळे या परिसरात पावसाचे पाणी साचले होते, त्यामुळे दोन-तीन दिवस उद्योजकांसह कामगारांनाही त्रास सहन करावा लागला होता़

 

नियोजनशून्यतेमुळे वायफळ खर्च
एम़ सेक्टर मधील तुकाराम नारखेडे यांच्या प्लॉटमधून पाईप टाकून व पुढे सतीश भोळे, नेमाडे व खडके या शेतकºयांच्या शेताला लागून कंत्राटदाराने पाणी काढण्यासाठी गटारीचे बांधकाम काम केले, मात्र या शेतकºयांनी या बांधकामाला विरोध करत मोजणी करून काम करण्याची तक्रार केली़ मात्र तरीही दरम्यानच्या काळात बांधकाम पूर्ण करण्यात आले़ तरी कोणताही निर्णय न झाल्याने, संबंधित शेतकºयांनी शेतीच्या मशागतीची कामे करायची म्हणून, जेसीबी मशिनच्या साहाय्याने माती लोटून या गटारी बुजून टाकल्या आहेत़ या गटारी बुजताना अनेक ठिकाणी गटारींचे कठडेही तुटल्याचे दिसत आहे़

Web Title: Dusty storm in space

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.