कर्तव्य..पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा राजाला झाला बोध
By admin | Published: May 21, 2017 01:13 PM2017-05-21T13:13:19+5:302017-05-21T13:13:19+5:30
वीकेण्ड स्पेशलमध्ये प्रा.डॉ.प्रभाकर चौधरी यांनी संस्कारदीप या सदरात केलेले लिखाण.
Next
एका अरण्यातील गोष्ट आहे. तेथे एका हरिणीला एकदा खूप तहान लागली. तहानेनं कासावीस होऊन अरण्यात ती पाणी शोधत होती. पळत होती. तिला तलाव दिसला. तिकडे ती पळत होती. तेवढय़ात तिला आपल्यावर बाणाचा नेम धरून दबा धरून बसलेला माणूस दिसला. ती पाणी पिणार तितक्यात तिला तो दिसला. तो राजा होता. ती थांबली, ती राजाला म्हणाली, ‘‘बाण सोडण्याच्या आधी माझी एक विनंती ऐक. मी तुङया निशाण्यावर आहे. तुम्ही राजे आहात. मी प्रजा आहे. प्रथम मी माङया मुलांना पतीकडे सोपवून येते, नंतर तुम्ही माझी शिकार करावी, एवढीच माझी विनंती आहे.’’
राजा म्हणाला, ‘‘मी तुङयावर कसा विश्वास ठेवू.’’ हरिणी म्हणाली, ‘‘मी प्रामाणिक राजाची प्रजा आहे. परत निश्चित येईन.’’ राजाने तिला जाऊ दिले.
हरिणीनं पाणी पिलं. ती घराच्या दिशेने निघाली. घरी आली. तिनं आपल्या मुलांना कवटाळले. हरणाला सगळी गोष्ट सांगितली. हरिण म्हणाले, ‘‘तुङयाशिवाय मुलांचं पालनपोषण शक्य नाही. म्हणून तू थांब, मी जातो.’’ यावर हरिणी म्हणाली, ‘‘नाही, अरे मी वचनबद्ध आहे.’’
दोघांची कुजबुज ऐकून मुलं म्हणाली, ‘‘तुम्ही इथेच थांबा. आम्ही जातो.’’
त्यांच्यात निर्णय झाला नाही. तेव्हा सगळे चारही जण राजाकडे जायला निघाले. ते त्याच्याजवळ आले. हरिणी म्हणाली, ‘‘राजा, मी तर आलेच आहे. सोबत तिघांना आणले आहे.’’
राजाने हरिणीच्या डोळ्यात वचन निभावण्याची वृत्ती बघितली. त्या चौघांची भावना बघून राजा शरमिंदा झाला. पशुपक्षीसुद्धा आपली प्रजाच आहे, याचा त्याला बोध झाला.