चाळीसगावात चोरट्याने लांबविली उपजिल्हाधिकाऱ्यांची बॅग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2018 09:33 PM2018-04-07T21:33:06+5:302018-04-07T21:33:06+5:30

पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली.

dy.collectors Bags fired in Chalisgaon | चाळीसगावात चोरट्याने लांबविली उपजिल्हाधिकाऱ्यांची बॅग

चाळीसगावात चोरट्याने लांबविली उपजिल्हाधिकाऱ्यांची बॅग

Next
ठळक मुद्देपाचोरा येथील रहिवासी असलेल्या नीलम बाफना औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारीकंडक्टरच्या सीटवर बॅग ठेवल्यानंतर लांबविली बॅगचाळीसगाव बसस्थानकात पोलीस गस्तीची गरज

आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.७ : पाचोरा येथील रहिवासी व औरंगाबाद येथे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी असलेल्या नीलम बाफना यांची अज्ञात चोरट्याने बॅग ६ रोजी चाळीसगाव बसस्थानकातून लांबविल्याची घटना घडली.
पाचोरा येथील रहिवासी असलेल्या नीलम बाफना या औरंगाबाद येथून ६ रोजी बसने निघाल्या होत्या. चाळीसगाव आगारात बस आल्यानंतर त्यांची बॅग त्यांनी कंडक्टरच्या सीटवर ठेवली व बाहेर गेल्या. ही संधी साधत अज्ञात चोरट्याने ही बॅग गायब केली. या बॅगमध्ये ३ ग्रॅम सोन्याच्या रिंगा, ३ हजार रुपये रोख, एटीएम कार्ड व इतर कागदपत्रे असा १८ हजार १०० रुपयांचा ऐवज होता. या प्रकरणी चाळीसगाव पोलीस स्टेशनला त्यांनी घटनेची माहिती दिली आहे.
दरम्यान, चाळीसगाव बसस्थानक परिसरात बॅग चोरीसह छोट्यामोठ्या चोºयांच्या घटनांमध्ये देखील वाढ झाली आहे.
बसमध्ये चढतांना सोनसाखळी लांबविणे तसेच पैसे गायब करणे अशा घटना होत असताना या गुन्ह्यांचा तपास मात्र लागत नाही. त्यामुळे पोलिसांची नियमित गस्त असावी अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

Web Title: dy.collectors Bags fired in Chalisgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.