जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2018 11:56 AM2018-10-24T11:56:12+5:302018-10-24T11:56:28+5:30

घटना घडल्यानंतर विवाहितेला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते

Dying during the treatment of burning brides | जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

जळीत विवाहितेचा उपचारादरम्यान मृत्यू

googlenewsNext

जळगाव : दसऱ्याच्या दिवशी जळालेल्या अश्विनी पवन पाटील (२५, रा. खंडवा, मध्यप्रदेश) या विवाहितेचा मंगळवारी संध्याकाळी जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, यावल येथील माहेर असलेल्या अश्विनी पाटील हिचा विवाह पवन पाटील यांच्याशी झाला होता. पवन पाटील हे खंडवा येथे रिक्षा चालवितात. खंडवा येथेच अश्विनी ही पती व सासू सासºयांसह राहत होती. तेथे राहत्या घरात दसºयाला रात्रीच्यावेळी तिच्या अंगावर दिवा पडून ती जळाल्याची माहिती तिच्या सासरच्या मंडळींनी दिली, असे विवाहितेचे वडील राजू अमोल कोलते यांनी सांगितले.
घटना घडल्यानंतर विवाहितेला इंदूर येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तिला रविवारी जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविण्यात आले. येथे उपचारादरम्यान मंगळवारी संध्याकाळी विवाहितेचा मृत्यू झाला.
विवाहितेच्या पश्चात पती, पाच वर्षाचा समर्थ व दोन वर्षांचा सार्थक असे दोन मुले आहे. विवाहितेच्या मृत्यूनंतर तिच्या आई-वडिलांसह भाऊ व इतर नातेवाईकांना शोक अनावर झाला.

Web Title: Dying during the treatment of burning brides

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.