अमळनेर तालुक्यातील आठशे लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:12 AM2021-06-18T04:12:41+5:302021-06-18T04:12:41+5:30

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन ...

E-Home entry of 800 beneficiaries in Amalner taluka | अमळनेर तालुक्यातील आठशे लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

अमळनेर तालुक्यातील आठशे लाभार्थ्यांचा ई-गृहप्रवेश

Next

महाआवास अभियान-ग्रामीण अंतर्गत ई-गृहप्रवेश कार्यक्रम मुंबई येथील सह्याद्री अतिथिगृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आदी मान्यवर उपस्थित होते. येथील पंचायत समिती कार्यालयात सहायक गटविकास अधिकारी संदीप वायाळ, माजी उपसभापती शाम अहिरे, पं. स. सदस्य प्रवीण पाटील, विनोद जाधव, कक्ष अधिकारी के. डी. पाटील, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, अधिकारी व कर्मचारी यांच्यासह लाभार्थी इंदुबाई पाटील (निम), अशोक पाटील (निम), नंदू राठोड (सारबेटे खु.), प्रवीण कोळी (जैतपीर) उपस्थित होते. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले.

तालुक्यात २० नोव्हेंबर २०२० ते ५ जून २०२१ या कालावधीत राबविल्या गेलेल्या या अभियानांतर्गत तालुक्यातील ८०० नागरिकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले आहे. महा आवास अभियानाअंतर्गत तालुक्यात प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत एकूण ४५० घरकुले अभियान कालावधीमध्ये पूर्ण करण्यात आली.

राज्य पुरस्कृत शबरी आवास योजना आणि रमाई आवास योजना अंतर्गत एकूण ३५० लाभार्थ्यांच्या घरकुलांचे काम पूर्ण करण्यात आले. राज्यात या अभियान काळात पूर्ण झालेल्या सुमारे तीन लाख २३ हजार घरांचा ताबा संबंधित लाभार्थ्यांना देण्यात आला.

Web Title: E-Home entry of 800 beneficiaries in Amalner taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.