मूल्यशिक्षणा सोबत ई-लर्निगचा आदर्शपाठ
By Admin | Published: May 6, 2017 06:12 PM2017-05-06T18:12:58+5:302017-05-06T18:12:58+5:30
सर्व शाळा डिजिटल करण्याच्या शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेत
ऑनलाइन लोकमत / संजय हिरे
लोकसहभाग व श्रमदानातून डिजिटल शाळेकडे वाटचाल : शिक्षकांनी स्वत:च दिला शाळेला रंग
खेडगाव, जि. जळगाव, दि. 6 - प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत ई-लर्निगचा शालेय वतरुळात गाजावाजा सुरू आहे. सर्व शाळा डिजिटल करण्याच्या शासनाच्या या मोहिमेत सहभाग घेत खेडगाव येथील ब.शि.हिरे विद्यालयाच्या शिक्षकांनी गावातून 35 हजारावर लोकवर्गणी जमा करीत स्वत:च शाळा इमारतीस रंग दिला. यातून बचत झालेल्या पैशांतून डिजिटल साहित्य खरेदीचा शिक्षकांचा मानस आहे. यातून या शिक्षकांनी श्रमदानाचा आदर्शपाठ घालून दिला आहे. ई-लर्निग बरोबरच मूल्यशिक्षणाचे महत्त्व येथे अधोरेखित होते.
शिक्षकांनी केली पैशांच्या अडचणीवर मात
सवरेदय शिक्षण संस्था उंबरखेडे संचलित खेडगावच्या विद्यालयाची 12 खोल्यांची इमारत आहे. यातील तीन खोल्या संस्थेने नुकत्याच बांधून दिल्या. यामुळे लगेचच पूर्ण इमारतीला रंगकामासाठी पैसे उपलब्ध होण्यास अडचण होती. मुख्याध्यापक सुभाष चौधरी, शिक्षकवर्ग व कर्मचा:यांनी गावात फिरुन ‘शाळा आपली..’ या भावनेतून ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले व तीन-चार मदत फे:यातून 35 हजाराची लोकवर्गणी जमा झाली. त्यातून इमारतीला रंग घेतला.
ई-लर्निगच्या रंगात रंगले शिक्षक
खेडगाव येथील विद्यालय शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व विद्याथ्र्याच्या विविधांगी विकासासाठी नावारुपास आले आहे. यावर्षी डिजिटल शाळेचा उपक्रम येथे अग्रक्रमाने राबवला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षणात नावीन्य आणणे व त्यासाठी तांत्रीक शिक्षण देणे, शाळेचे स्वरुप (सजावट) बदलणे आवश्यक होते. लोकवर्गणीतून जमा झालेल्या पैशातून शाळेला रंग देण्यासाठी पेंटरचा शोध घेतला. मात्र 35 हजाराची मागणी झाली. हा पैसा वाचविण्यासाठी शिक्षकांनीच स्वत: शाळेला रंग देण्याचा निर्णय घेतला. 1 मे आधी शैक्षणिक वर्ष संपण्यापूर्वी शिक्षकांनी शालेय कामकाज, परीक्षा, निकाल सांभाळून इतर वेळेत 15 दिवस शाळेला रंग दिला अन् शाळा उजळून निघाली.
ई-लर्निगचा पाया रचला गेला. आता शिक्षकदेखील आर्थिक मदत देणार आहेत व रंगरंगोटीच्या कामातून कामासाठी वाचलेल्या पैशातून डिजिटल साहित्य खरेदी करणार आहेत. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा:यांच्या या उपक्रमाचे संस्था चेअरमन उदेसिंग पवार, सचिव डी.डी.पाटील यांनी विशेष कौतुक केले. रंग देण्यासाठी मुख्याध्यापक सुभाष चौधरी, शिक्षक रमेश अहिरे, नगराज मोरे, देवेंद्र अहिरे, अनिल चव्हाण, अमरसिंग पाटील, संजय पाटील, सचिनपगार, मनोज महाजन, सुनीता पाटील, रुपाली पाटील, शामकांत सूर्यवंशी, सचिन पाटील, हरपालसिंग पाटील, केवलसिंग कच्छवा, जगन्नाथ पाटील, युवराज हिरे यांनी परिश्रम घेतले.