वीज खंडित असलेल्या शाळांमध्ये लाखाचे इ-लर्निग कीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2017 01:06 AM2017-04-28T01:06:36+5:302017-04-28T01:06:36+5:30
जि.प.चा सावळा गोंधळ : 48 लाखांचा निधी, बॅटरीचेही वितरण
जळगाव : विद्याथ्र्याचे आयुष्य प्रकाशमान करण्यास लाभदायी ठरू शकणा:या इ-लर्निग यंत्रणा वाटपाबाबत जि.प.मध्ये सावळा गोंधळ उघडकीस आला असून, चक्क वीजपुरवठा नसलेल्या किंवा वीज खंडित केलेल्या जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये 98 हजार रुपये किमतीचे इ-लर्निग कीट वितरित केले जात आहेत.
त्यात जळगाव तालुक्यातील नशिराबाद कन्या शाळा क्र.2, खेडी खुर्द व मोहाडी येथील शाळेत वितरण झाले आहे. त्यातील नशिराबाद व खेडी खुर्द येथील शाळेत वीजच उपलब्ध नाही. जि.प.ने 31 मार्चपूर्वी शिल्लक निधी खर्च करण्यासाठी 48 लाख निधीची तरतूद करून जिल्हाभरातील 15 तालुक्यांमधील 50 जि.प.च्या शाळांमध्ये हे कीट बसविण्यास मंजुरी दिली. हे कीट पुणे येथील पुरवठादाराकडून बसविण्यास सुरुवात झाली आहे. पुरवठादार थेट येऊन ते शाळेत बसवून निघून जातात. ते व्यवस्थित सुरू झाले की नाही, त्यांची गुणवत्ता करारात नमूद केलेल्या बाबींनुसारच आहे की नाही याची खात्री कुठेही झालेली नाही. या कीटमध्ये प्रोजेक्टर, स्पीकर, 1 ली ते 7 वीच्या अभ्यासक्रमाची माहिती असलेले सॉफ्टवेअर आदी यंत्रणेचा समावेश आहे, असे गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण म्हणाल्या.
यावल, जळगावात वितरण
मागील तीन दिवसात यावल व जळगाव तालुक्यात या कीटचे वितरण झाले. पण विजेअभावी तूर्ततरी या कीटचा कुठलाही उपयोग संबंधित दोन शाळांना नाही.
दोन तासांचा बॅटरी बॅकअप
इ- लर्निग कीटसोबत दोन तास चालणारी बॅटरी आहे. पण विजेशिवाय या बॅटरीचाही उपयोग नाही. शाळांना व्यावसायिक दरात वीजबिल दिले जात असल्याने थकबाकी वाढून वीजपुवरठा खंडित झाल्याचे सांगण्यात आले.
इतरत्रही गोंधळ
जळगावात तीनपैकी दोन शाळांमध्ये वीज उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे, अशातच जिल्हाभरात जेथे मागील काळात इ-लर्निंगचे साहित्य दिले त्यातील अनेक शाळांमध्ये विजेअभावी हे साहित्य पडून आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असल्याची कुरबूर काही शिक्षकांमध्येही आहे.
पुण्याचे कर्मचारी आले.. यासंदर्भात गटशिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण यांना विचारले असता इ-लर्निगचे कीट पुणे येथील कर्मचा:यांनी बसविले. याबाबत मुख्यालयातील अधिकारीच सांगू शकतील.