ई-पास सामान्यांंच्या आवाक्याबाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 12:26 AM2020-07-23T00:26:17+5:302020-07-23T00:27:10+5:30

सामान्य नागरिकांना बाहेरगावी जाणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर तसेच खिशाला न परवडणारे झाले आहे.

E-pass is beyond the reach of the common man | ई-पास सामान्यांंच्या आवाक्याबाहेर

ई-पास सामान्यांंच्या आवाक्याबाहेर

Next
ठळक मुद्देआॅनलाईनसाठी मोजावे लागतात जादा पैसेजुगाड न जमल्याने नेटचालक घेतात अव्वाच्या सव्वा


बोदवड, जि.जळगाव : सामान्य नागरिकांना बाहेरगावी जाणे आता त्यांच्या आवाक्याबाहेर तसेच खिशाला न परवडणारे झाले आहे.
कोरोनाच्या काळात नागरिक आधीच हैराण आहेत. याचा पुरेपूर फायदा सायबर कॅफेचालक तसेच खासगी वाहनचालक यंत्रणा उचलत आहे, तर यात मात्र ज्याला ऐन वेळवर बाहेरगावी जाणे गरजेचे आहे त्याला तर हा भुर्दंड सोसावाच लागतो.
बाहेरगावी सोयरीक अथवा आप्तस्वकियांकडे सुख-दु:खाच्या कामानिमित्त जाण्यासाठी सर्वात अगोदर सुरवात होते ती वैद्यकीय परवानगीपासून, त्यानंतर वाहन परवाना, त्याचप्रमाणे सदर प्रवास कर्ते किती, त्यांच्यासाठी शासकीय ई-पास यासाठी इंटरनेट साईडची माहिती परिपूर्ण नसल्याने नागरिक सहज इंटरनेट कॅफेकडे वळतात व त्यात साधा अर्ज करण्यासाठी माणूस पाहून ५० ते १०० रुपये दर आकारला जातो. तसेच या प्रवासाच्या खासगी वाहनासाठी इ पासचा वेगळा दर आहे. खासगी वाहनचालक अंतर पाहून दर ठरवतात, तर त्यांचीही लिंक लागलेली असते. या सर्व परिश्रमातून सामान्य नागरिकांचा हा प्रवास होत आहे.
ज्यांच्याकडे ई-पासची साईड आहे व इंटरनेटची माहिती आहे त्यांच्यासाठी शासनाने आॅनलाईन पाससाठी साईट दिली आहे. परंतु यावर बऱ्याच वेळा अर्ज पूर्ण करताना अडचण निर्माण होते. त्यामुळे १०० रुपयांच्या दरात आॅनलाईन पास तर २०० ते तीनशेमध्ये सहज वाहनचालक सर्व कार्यक्रम सोपस्कार करून देतात.

Web Title: E-pass is beyond the reach of the common man

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.