जळगावात रेशन दुकानदारांना ई पॉस मशिनचे वाटप

By admin | Published: June 22, 2017 12:45 PM2017-06-22T12:45:51+5:302017-06-22T12:45:51+5:30

रेशन दुकानदारांना बुधवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ई पॉस मशिनचे वितरण करण्यात आले.

E-pOS machine allocation to ration shoppers in Jalgaon | जळगावात रेशन दुकानदारांना ई पॉस मशिनचे वाटप

जळगावात रेशन दुकानदारांना ई पॉस मशिनचे वाटप

Next

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.22 : सार्वजनिक वितरण प्रणालीत धान्य वाटप बायोमॅट्रीक पद्धतीने व्हावे या महत्त्वाकांक्षी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शहर व तालुक्यातील रेशन दुकानदारांना बुधवारी जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या हस्ते ई पॉस मशिनचे वितरण करण्यात आले. 
जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात हा कार्यक्रम झाला. प्रास्ताविक पुरवठा अधिकारी मनोज घोडेपाटील यांनी केले. जिल्हा रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष जमनादास भाटिया यांनी जिल्हाधिका:यांना लिंबाचे रोप देऊन स्वागत केले. यावेळी रेशन दुकानदारांना मानधन दिले जावे अशी त्यांनी मागणी केली. ई पॉस मशिनमुळे रेशन वितरण व्यवहारात पादर्शकता येईल असा विश्वास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. यावेळी प्रांताधिकारी जलज शर्मा, सहाय्यक पुरवठा अधिकारी विलास हरिमकर, तहसीलदार अमोल निकम, पुरवठा तपासणी अधिकारी दीपक कुसकर, योगेश नन्नवरे, जिल्हा दक्षता समितीचे अनिल अडकमोल उपस्थित होते. 

Web Title: E-pOS machine allocation to ration shoppers in Jalgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.