मान्सून लवकर; यंदा कापसाचे क्षेत्र ५ टक्क्यांनी वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 12:26 PM2020-05-21T12:26:43+5:302020-05-21T12:26:53+5:30
कृषी विभागाचा अंदाज : शेतकऱ्यांचा कल तृणधान्यांकडे राहणार
जळगाव : यंदा मान्सूनचे आगमन गेल्या वर्षाच्या तुलनेत थोडे लवकर होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनीदेखील खरीप हंगामाची तयारी सुरु केली असून यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत चार ते पाच टक्के खरीपाची पेरणी अधिक होणार असल्याचा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
गतवर्षीच्या तुलनेत पावसाची टक्केवारी यंदाही चांगली राहणार असल्याचा अंदाज असल्याने कृषी विभागाने खरीप हंगामासाठी पीक, पेरणी, बी-बियाणे आणि खतांचे नियोजन पूर्ण केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात गतवर्षाच्या तुलनेत चार ते पाच टक्के पिकाखालील क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. अनेक संकटे झेलणाºया शेतकºयाला यंदाचा मान्सून तरी दिलासा देईल, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.
तृणधान्याचा क्षेत्रात वाढ होणार
यंदाच्या खरीप नियोजनानुसार मका, तूर, मूग, उडीद व सोयाबीन या पिकांखालील क्षेत्रात घट तर ज्वारी व बाजरी या पिकांखालील क्षेत्रात घट होणार आहे. गेल्या वर्षीच्या खरिपाच्या तुलनेत यंदा तृणधान्याच्या पेरणीत वाढ होणार आहे. सोयाबीनचे बियाणे देखील भरपूर आहे. मात्र, लष्करी बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनाने १ जूननंतरच पेरणी करण्याचा सूचना दिल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांनी लवकर पेरणी करू नये म्हणून २५ मे नंतर बाजारात बियाणे उपलब्ध होणार आहे.
कर्जपुरवठा कमी झाल्याने होणार परिणाम
यंदा खरीपाच्या क्षेत्रात अजून काही प्रमाणात वाढ झाली असती मात्र, पीककर्ज पुरवठा चांगल्या प्रकारे न झाल्याने त्याचा परिणाम खरीपाच्या लागवडीवर होण्याची शक्यता आहे. जिल्ह्णात कर्जपुरवठा २ हजार ९२७ कोटींचा आराखडा असताना केवळ २८२ कोटींचे वाटप झाले आहे. यंदा लॉकडाऊन झाल्यामुळेरब्बीच्या पिकांची खरेदीअद्याप झालेली नाही. गेल्या वर्षाचा कापूस अजूनही शेतकºयांचा घरात पडून आहे. अशा परिस्थितीत कर्जाचा पुरवठा न झाल्यास शेतकºयांना खरीपाची तयारी करण्यास आर्थिक अडचणी निर्माण होवू शकतात.
३७ हजार हेक्टर क्षेत्र वाढणार
गेल्या वर्षी जून ते आॅक्टोबर या काळातील ५५ दिवसांत १४४ टक्के पाऊस झाला होता. शिवाय नोव्हेंबर महिन्यात देखील पाऊस झाला होता. यंदाही ९५ टक्के पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असल्याने कृषी विभागाने खरिपाच्या नियोजनात लागवडीखालील क्षेत्रात वाढ पाच टक्के वाढ केली आहे. खरिपासाठी गेल्या वर्षाच्या ७ लाख २८ हजार ७४४ हजार १४९ हेक्टरमध्ये वाढ करून यंदा ७ लाख ७५ हजार ५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन केले आहे. जिल्ह्णात एकूण क्षेत्र ८ लाख १० हजार ५०७ हेक्टर क्षेत्र आहे. दरवर्षी, सरासरी ७ लाख ५० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीपाची पेरणी होत असते.
५ लाख हेक्टरवर होणार कापसाची पेरणी
जिल्ह्णात खरीपाचे मुख्य पीक हे कापसाचेच आहे. गेल्यावर्षी जिल्ह्णात ५ लाख १० हजार ९११ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली होती. यंदा काही प्रमाणात क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असून, यावर्षी ५ लाख २५ हजार क्षेत्रावर कापसाची लागवड होण्याचा अंदाज आहे. यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बोंडअळीचे प्रमाण कमी राहणार आहे. त्यामुळे कापसाच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती कृषी उपसंचालक अनिल भोकरे यांनी ‘लोकमत’ ला दिली.
मुख्यमंत्री आज घेणार आढावा... मुख्यमंत्री गुरुवारी खरीप हंगामाचा आढावा घेणार असून, पालकमंत्री गुलाबराव पाटील जिल्ह्याच्या स्थितीची माहिती देणार आहेत.