काम न करणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटणार - सुरेशदादा जैन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 12:47 PM2018-07-31T12:47:32+5:302018-07-31T12:47:49+5:30

भव्य रॅलीद्वारे शिवसेनेचे शक्तीप्रदर्शन

The ears of corporators who do not work will raise - Sureshdada Jain | काम न करणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटणार - सुरेशदादा जैन

काम न करणाऱ्या नगरसेवकांचे कान उपटणार - सुरेशदादा जैन

Next
ठळक मुद्दे

जळगाव : विरोधकांकडून सत्तेसाठी विनवण्या केल्या जात आहेत. एक वर्र्ष तरी सत्ता द्या असे सांगितले जात आहे. मात्र, शिवसेना जळगावकरांच्या सेवेसाठी पाच वर्षांसाठी सत्ता मागत आहे. आमचे सर्व उमेदवार शहराच्या विकासासाठीच निवडणुकीत उभे असून, निवडणुकीनंतर जे नगरसेवक काम करणार नाहीत. त्यांचे कान उपटून काम करायला लावेल असे प्रतिपादन माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी केले.
सोमवारी मनपा निवडणुकीसाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी शिवसेनेकडून प्रचंड रॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप कोर्ट चौक परिसरात झाला. यावेळी झालेल्या सभेत ते बोलत होते. यावेळी सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, आमदार प्रा.चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, माजी आमदार आर.ओ.तात्या पाटील, जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांच्यासह शिवसेनेचे सर्व उमेदवार उपस्थित होते.
सतरा मजलीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार
सुरेशदादा म्हणाले, मी जळगावचा पूत्र असून आतापर्यंत जो विश्वास शहवासीयांनी माझ्यावर दाखवला आहे. तो विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन मतदारांना केले. मनपात विजय शिवसेनेचाच होणार असून, सतरा मजलीवर केवळ शिवसेनेचाच भगवा फडकेन असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला. सत्तेवर आल्यानंतर शहराचा विकास करण्यासाठी शासनाकडून ४०० कोटींचा निधी आणण्यात येईल. तो मिळाला नाही तर आम्ही निधी उभा करु असेही सुरेशदादा म्हणाले.
ए.टी.नाना तुम ना आना, अब जाना काना-काना....
गुलाबराव पाटील म्हणाले की, भाजपाचे खासदार ए.टी.पाटील यांना प्रचंड मताधिक्याने जळगावकरांनी निवडून दिले. मात्र, त्यांनी जळगावकरांसाठी एक रुपयाचीही मदत केली नाही. त्यामुळे यंदा जर का मत मागायला ते आले तर त्यांना सांगा ‘ए.टी.नाना तुम ना आना, अब जाना काना-काना’ असे म्हणत ए.टी.पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडले. सुरेशदादा जैन यांनी जे कार्य, जो विकास शहराचा केला आहे. तो कुणीही विसरु शकत नाही.

Web Title: The ears of corporators who do not work will raise - Sureshdada Jain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.