पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:20 AM2021-08-14T04:20:30+5:302021-08-14T04:20:30+5:30

खबरदारी : उघड्यावरील खाद्यपदार्थ न खाण्याचे आवाहन जळगाव : टायफाॅइड हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे. या आजाराची ...

Eating panipuri invites typhoid. | पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय..

पाणीपुरी खाताय की टायफाॅइडला निमंत्रण देताय..

Next

खबरदारी : उघड्यावरील खाद्यपदार्थ न खाण्याचे आवाहन

जळगाव : टायफाॅइड हा पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर होणारा आजार आहे. या आजाराची लागण उघड्यावरील दूषित अन्न किंवा दूषित पाणी पिण्यामुळे होते. कामानिमित्त सकाळपासून घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांचा पाणीपुरी, वडापाव, पोहे आदी खाद्यपदार्थ खाण्यावर सर्वाधिक भर असतो. मात्र, बऱ्याच ठिकाणी विक्रेते उघड्यावरच खाद्यपदार्थ विक्री करत असल्यामुळे त्यांचा संबंधितांच्या आरोग्यावर परिणाम होऊन टायफाॅइडसारखे आजार उद्भवतात. त्यामुळे खासकरून नागरिकांनी पावसाळ्यात उघड्यावरील खाद्यपदार्थ न खाण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ञ्ज्ञांमधून केले जात आहे.

इन्फो :

आजाराची लक्षणे :

- अतिउच्च क्षमतेचा ताप येणे.

-वारंवार उलट्या आणि जुलाब होणे.

- मूत्रविसर्जन करताना जळजळ होणे.

-अशक्तपणा व थकवा जाणवणे.

इन्फो :

ही घ्या काळजी

-उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाऊ नये. तसेच ब-याच वेळाने तळलेले किंवा शिजवलेले अन्नपदार्थ खाऊ नयेत.

- तसेच पाणी उकळून प्यावे. उघड्यावर शौचाला बसू नये. घराच्या आजूबाजूला स्वच्छता ठेवण्याचे आवाहनही मनपाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. राम रावलानी यांनी केले आहे.

इन्फो :

जिल्हा रुग्णालयातील टायफाॅइडचे रुग्ण

जून २०१८ :

जुलै २०१९ :

ऑगस्ट २०२०:

Web Title: Eating panipuri invites typhoid.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.