पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2019 12:39 PM2019-10-23T12:39:10+5:302019-10-23T12:39:33+5:30

चीनच्या फटाक्यांना यंदाही ‘ना’

Eco-friendly fireworks are on the market, buzzing around for purchase | पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग

पर्यावरणपूरक फटाके बाजारात दाखल, खरेदीसाठी लगबग

Next

जळगाव : दिवाळी सणाला फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषण न होण्याच्या सक्तीनंतर व तसे प्रमाणपत्र घेणे सक्तीचे केल्याने त्याची बहुतांश कंपन्यांनी अंमलबजावणी केल्यानंतर बाजारात पर्यावरणपूरक फटाके (ग्रीन फायरवर्क) दाखल झाले आहेत. दरम्यान, गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील चीनचे फटाके विक्री न करण्याचा निर्धार विक्रेत्यांनी केला आहे.
दिवाळी म्हटले म्हणजे फटाक्यांची जोरदार आतीशबाजी हे शेकडो वर्षांचे गणित आहे. पर्यावरणाच्या मुद्यावरून यंदा नागपूर येथील संस्थेला पर्यावरणपूरक फटाक्यांचे नमुने तयार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यानुसार संस्थेकडून प्रमाणपत्रही सक्तीचे करण्यात आले. यात जळगावात देशातील विविध भागातून फटाके दाखल झाले असून त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
बाजारपेठेत साधारण १२० रुपयांपासून ते तीन हजार रुपये किंमतीचे फटाक्यांचे खोके (बॉक्स) बाजारपेठेत उपलब्ध झालेले आहेत. लहान फटाके, रंगबेरंगी फटाके तसेच मोठे बॉम्ब असे विविध प्रकारचे फटाके असलेले हे बॉक्स सध्या आकर्षण ठरत असून त्या सोबतच सुट्या फटाक्यांनाही मागणी असल्याचा दरवर्षीचा अनुभव असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ९ वस्तूंचा गिफ्ट बॉक्स १२० रुपये, १८ वस्तूंचा बॉक्स २१० रुपये, २६ वस्तूंचा बॉक्स ४०० रुपये, ३८ वस्तूंचा बॉक्स ६३० रुपये व त्यापेक्षाही मोठे बॉक्स बाजारपेठेत उपलब्ध आहेत.
विविध प्रकारचे फटाके वेधताहेत लक्ष
बाजारपेठेत दाखल झालेल्या फटाक्यांमध्ये फॅन्सी फटाके, विविध प्रकारचे रॉकेट तसेच फ्लॉवर पॉटमध्ये रंगीला, बो-बो, क्रॉकलिंग, मल्टी कलर पॉट तर चक्करमध्ये २५ शॉटस्, ५० शॉटस्, १०० शॉटस्, २०० शॉटस्, ५०० शॉटस् हे फटाके आकर्षण ठरत असून त्यांना जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीच्या १० दिवस अगोदर फटाके खरेदीसाठी दरवर्षी गर्दी होत असते, मात्र यंदा त्यापूर्वीच होलसेल विक्रीसह किरकोळ विक्रीस सुरुवात झाली आहे. यंदा पाऊसही चांगला झाला असल्याने फटाक्यांची खरेदी वाढली असल्याचे चित्र बाजारपेठेत आहे.

बाजारपेठेत फटाक्यांना चांगली मागणी असून खरेदीला वेग आला आहे. - चंद्रकांत शिरोडे, अध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.

बाजारपेठेत विविध प्रकारचे फटाके दाखल झाले असून यंदा अनेक कंपन्यांनी पर्यावरणपूरक फटाक्यांची निर्मिती केली आहे.
- युसुफ मकरा, कार्याध्यक्ष, जळगाव डिस्ट्रीक्ट फायरवर्क्स असोसिएशन.

बाजारपेठेत विविध प्रकारचे व वेगवेगळ््या आकारातील फटाक्यांचे बॉक्स उपलब्ध आहेत. त्यांना पसंती दिली जात आहे.
-शब्बीर मकरा, फटाकेविक्रेते.

Web Title: Eco-friendly fireworks are on the market, buzzing around for purchase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव