शाडू मातीपासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2019 11:01 PM2019-08-28T23:01:44+5:302019-08-28T23:01:49+5:30

धानोरा, ता.चोपडा : येथील झि.तो.म. माध्यमिक व ना.भा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविणाचा उपक्रम ...

Eco-friendly Ganesh idol made from shadow soil | शाडू मातीपासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

शाडू मातीपासून बनविल्या पर्यावरणपूरक गणेशमूर्ती

Next



धानोरा, ता.चोपडा : येथील झि.तो.म. माध्यमिक व ना.भा. पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती मूर्ती बनविणाचा उपक्रम राबविण्यात आला.
विद्यालयातील राष्ट्रीय हरितसेना व पर्यावरण विभागाच्या वतीने प्राचार्य के.एन.जमादार यांच्या मार्गदर्शनात हरितसेना शिक्षक देविदास महाजन शाळेत हा उपक्रम राबवित आहेत.
एकही प्लास्टर आॅफ पॅरिसची मूर्ती विकत न घेता शाडू मातीचीच बसविण्याचा संकल्प विद्यार्थ्यांकड़ून करून घेतला. रविंद्र नवल कोळी व योगेश भगवान कुंभार यांनी अत्यंत सोप्या पद्धतीने नैसर्गिक टाकाऊ साहित्य व शाडू मातीचा उपयोग करून विद्यार्थ्यांना मर्तीला सुबक आकार देण्याचे शिकविले. संस्थेचे अध्यक्ष बी.एस.महाजन, शाळेचे चेअरमन सुखदेवराव पाटील, चुड़ामण पाटील, वामनराव महाजन, प्रदीप महाजन, शिक्षक, पालक आदींनी उपक्रमाचे कौतुक केले.

 

Web Title: Eco-friendly Ganesh idol made from shadow soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.