सुवासिनींनी मागितले सौभाग्यासह पर्यावरणपूरक जीवनाचे दान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2019 02:59 PM2019-06-16T14:59:49+5:302019-06-16T15:00:11+5:30
निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वट वृक्षाकडे मागितले.
चाळीसगाव, जि.जळगाव : निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरातील विद्युल्लता कॉलनी परिसरातील महिला भगिनींनी पंचतत्वांची वटपूजा बांधून निरामय जीवनाचे मनोभावे दान वटवृक्षाकडे मागितले.
दरवर्षी मान्सूनपूर्व सरींनी वटपूजेचा सण आनंदात होत असतो. पूर्वीच्या काळी मातीचा ओला गंध, अंकुरलेले कोवळे तृणांकुर, पसरलेली हिरवाई आणि थंड हवेच्या झोक्यात वटपूजा साजरी व्हायची. पण गेली अनेक वर्षे वटपूजा कडक उन्हात साजरी होत आहे. प्रकृतीच्या सृजनशीलतेचा व नवनिर्मितीच्या प्रारंभी येणाºया वटवृक्ष पूजेतून सन्मानित व्हावे आणि निसर्ग सर्वार्थाने बहरावा आणि धरती सृजनशील व्हावी म्हणून आज महिलांच्या वतीने दान मागितले गेले.
निसर्ग प्रफुल्लीत राहिला तर मानवी जीवन समाधानी राहिल म्हणून आज गृहिणीनी नवनिर्मितीचा प्रणेता असलेल्या सजीव वरुणदेवाची व वर्षाॠतुची वटपूजा बांधून मनोभावे प्रार्थना केली. सर्व चराचर सृष्टीची भरभराट होवो, पाऊस चांगला पडो, शिवारात धनधान्य उपजो अशी प्रार्थनाही यावेळी करण्यात आली. यावेळी शोभा कोतकर, सुनंदा ब्राह्मणकर, अलका शाह, कविता साळुंखे, जयश्री भोकरे, योगिनी ब्राह्मणकर, निर्मला महाजन, छाया महाजन आदी महिला भगिनी उपस्थित होत्या.