आर्थिक नाकेबंदी हाच चीनला खरा धडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 12:30 PM2020-06-19T12:30:58+5:302020-06-19T12:31:25+5:30

प्रत्येक भारतीयाने सरसावण्याची गरज

The economic blockade is a real lesson for China | आर्थिक नाकेबंदी हाच चीनला खरा धडा

आर्थिक नाकेबंदी हाच चीनला खरा धडा

Next

जळगाव : सीमेवर कुरघोड्या करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी आपले सैन्य त्यांच्याशी दोन करीतच आहे. या सोबतच प्रत्येक भारतीयाने चीनच्या वस्तूंसह मोबाईल अ‍ॅप नाकारून स्वदेशीचा नारा दिल्यास चीनची आर्थिक नाकेबंदी होऊन हाच चीनला खरा धडा असेल, असे आवाहन विविध संस्थांद्वारे केले जात आहे. यासाठी चीनच्या वस्तूंवर बहिष्कार टाकल्यास भारतीय सैन्याला हीच मदत ठरेल, असाही सूर उमटत आहे.
चीनच्या कुरापती पुन्हा सुरू झाल्या असून गलवान येथे घुसखोर चिनी सैनिकांशी झालेल्या हिंसक धुमश्चक्रीत आपल्या देशाचे अनेक जवान शहीद झाले. भारतीय जवानांनी सीमेवर चोख प्रत्युत्तरही दिले आहे. आता आपण सीमेच्या आत चीनला उत्तर देण्याची वेळ आल्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे करण्यात आले आहे. या सोबतच राष्ट्रीय सुरक्षा मंचच्यावतीनेदेखील चीनची आर्थिक कोंडी करण्याचे आवाहन केले जात आहे.
पूर्वीपासूनच चीन विरुद्ध रोष
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरातून चीनवर बहिष्काराचे अस्त्र उगारले जात आहे. यापासून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनने भारतीय सीमेवर कुरापती सुरू केल्या आहेत. यात आता तर भारतीय सैनिक शहिददेखील झाले. यामुळे देशभरासह शहरातही संतापाची लाट उसलळी आहे. या पूर्वीदेखील चीन विरुद्ध लढा उभा करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत गेल्या वर्षी श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळातर्फे आंदोलन उभारण्यात आले होते. यात चिनी वस्तूंवर पूर्णपणे बहिष्कारासाठी ठिकठिकाणी आवाहन करण्यात आले. तसेच शाळेमध्ये विद्यार्थ्यांना चिनी वस्तू न वापरण्याची शपथ देण्यात आली व महाविद्यालयांमध्ये पथनाट्यही सादर करण्यात आले. त्यानंतर चीनच्या प्रतिकात्मक ध्वजाचे दहन करण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून चीनविरुद्धची ही धगधगणाºया आग आता अधिकच भडकली आहे.
अ‍ॅप नाकारा
भारतीय जवानांनी सीमेवर चीनला चोख प्रत्युत्तर दिले असून आता आपण सीमेत चीनला उत्तर देण्याची वेळ आल्याचे आवाहन श्री स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय मंडळाचे अध्यक्ष नगरसेवक कैलास सोनवणे यांनी केले आहे. चिनी वस्तू खरेदी करू नये नाही, चिनी अ‍ॅप वापरणे बंद करा, असे आवाहन केले जात आहे. आमच्या पैशांनी चीनने गब्बर व्हायचे आणि आमचेच पैसे वापरून स्वत:चे सैन्य पोसायचे आणि आमच्या सीमा पोखरायच्या, असे प्रकार सुरू असल्याने हे रोखणे आपल्या हातात असल्याचेही संस्थेच्यावतीने सांगितले जात आहे.
सैन्य ‘बुलेट’ने लढते, आपण ‘व्हॅलेट’ने लढा
सीमेवर भारतीय सैन्य बंदुकीच्या गोळ््यांनी (बुलेट) लढत आहे, आपण देशात चीन विरुद्ध व्हॅलेटच्या माध्यमातून (पैशाच्या पाकिटने) लढा असे आवाहन राष्ट्रीय सुरक्षा मंचचे संयोजन सचिन नारळे यांनी केले आहे. जगभरातून चीन विरुद्धचा रोष व त्याच्यावर होणाºया बहिष्काराच्या कारवाईपासून लक्ष वळविण्यासाठी चीनने भारतीय सीमेवर कुरापती सुरू केल्याचा आरोप नारळे यांनी करीत भारतीयांनी मिळून चिनी वस्तू टाळाव्या व चीनला धडा शिकवावा, असे आवाहनही केले आहे.

चीनविरुद्ध लढा द्यायचा असेल तर चिनी वस्तू, अ‍ॅप नाकारावेच लागेल. चीनला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढे येणे गरजेचे आहे, तरच चीन वठणीवर येऊ शकेल.
- कैलास सोनवणे, अध्यक्ष, श्री स्वामी विवेकानंतर बहुउद्देशीय मंडळ


सध्या चीन सीमेवर गंभीर स्थिती आहे. आपले सैनिक बुलेटने लढत आहे, आपण आपल्या व्हॅलेटच्या माध्यमातून लढण्याची ही वेळ आहे. चीनची आर्थिक कोंडी केल्यावरच तो ठिकाणावर येईल. यासाठी प्रत्येक भारतीयाचा हातभार आवश्यक आहे.
- सचिन नारळे, संयोजक, राष्ट्रीय सुरक्षा मंच

Web Title: The economic blockade is a real lesson for China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव