देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने - नीलेश विकमसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 01:17 PM2017-09-28T13:17:47+5:302017-09-28T13:18:55+5:30

देशाचे भविष्य बदलविण्याची ताकद सी.ए.अभ्यासक्रमात

Economy of the country in the right direction - Nilesh Vikams | देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने - नीलेश विकमसे

देशाची अर्थव्यवस्था योग्य दिशेने - नीलेश विकमसे

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय वृद्धीदरावरही परिणाम नाहीसनदी लेखापालांची गरज वाढतेयतंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी

ऑनलाईन लोकमत

जळगाव, दि. 28 - नोटाबंदी असो अथवा वस्तू व सेवा कर (जीएसटी) प्रणाली असो, यामुळे भविष्यात चांगले परिणाम दिसणार आहे. यामुळे कोणताही परिणाम झाला नसून देशाची अर्थव्यवस्था योग्य पातळीवर असल्याचे आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष नीलेश विकमसे यांनी सांगितले.  नवीन कायद्यांमुळे चुकीचे काम करणा:यांना करांची भीती आहे, मात्र प्रामाणिक व्यक्तीला याची काहीही चिंता राहणार नसल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केली.  
रिंगरोडवरील आयसीएआय भवन येथे 27 सप्टेंबर रोजी जळगावशाखेला त्यांनी सदिच्छा भेटी दिली, त्या वेळी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल कौन्सिलचे सदस्य  मंगेश किनारे,  अनिल भंडारी, प्रफुल्ल छाजेड, सर्वेश जोशी, जळगाव शाखेच्या चेअरमन पल्लवी मयूर यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 दहा वर्षांनी सी.ए.च्या नवीन अभ्यासक्रमाची रचना होत असते. त्यात आता अर्थव्यवस्थेत व प्रशासकीय रचनेत सनदी लेखापालांची गरज वाढत आहे. त्यामुळे गरीब, श्रीमंत, युवक-युवती, कोणतेही आरक्षण असा भेदभाव नसलेला, सर्व समानता असलेला व भविष्यात अधिक उत्पन्न देणारा सी.ए.अभ्यासक्रम तयार कण्यात आला असून यामुळे विद्याथ्र्याना उज्‍जवल भविष्याच्या संधी असल्याचे विकमसे यांनी सांगितले. 

नोटाबंदीनंतर राष्ट्रीय वृद्धीदर कमी झाला असे वाटत असले तरी हा दर नोटाबंदी अथवा जीएसटीमुळे कमी झाला नसून तो आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम असल्याचे विकमसे यांनी स्पष्ट केले.

आयसीएआयने आंतरराष्ट्रीय स्तरावरही मोठे काम केले असून जी.एस.टी.विषयी जनजागृती व पुस्तके प्रकाशित केली आहेत. आयसीएआयला रेल्वे विभागाची अर्थविषयक जबाबदारी सोपविण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. संस्थेने डिजिटल अकौन्टन्सी बोर्ड तयार करुन तंत्रज्ञानाचे आव्हान पेलण्यासाठी तयारी केली आहे. कॅनडासारख्या देशात 12 हजार चार्टर्ड अकौन्टटची गरज असताना तिथे केवळ सहा हजार चार्टर्ड अकौन्टटंची उपलब्धता आहे. त्यामुळे आपल्या देशातील चार्टर्ड अकौन्टंटला देश विदेशात मोठय़ा संधी उपलब्ध असणारे हे करिअर असल्याचे विकसने यांनी सांगितले. 
पत्रपरिषदेला जळगाव शाखेचे उपाध्यक्ष अजय जैन, मानद सचिव स्मिता बाफना, पंकज अग्रवाल, माजी अध्यक्ष नितीन झंवर, निरंजन दोशी, जयेश दोशी, शेखर सोनाळकर आदींची उपस्थिती होती.

Web Title: Economy of the country in the right direction - Nilesh Vikams

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.