खाद्य तेलाच्या भावात पुन्हा वाढ, कोथिंबीर, मेथी वधारू लागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:31+5:302021-02-08T04:14:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खाद्य तेलामध्ये सुरू असलेल्या चढ-उतारमध्ये या आठवड्यात तेलाचे भाव पुन्हा वधारले आहे. सोयाबीन, शेंगदाणा तेलासह या आठवड्यात तर सूर्यफुलाच्या तेलाच्याही भावात वाढ झाली आहे. तसेच शेेंगदाण्याची आवक घटल्याने त्याच्या भावात झालेली वाढ अजूनही कायम आहे. इतर किराणा मालाचे भाव मात्र स्थिर असून
गेल्या एक-दीड महिन्यापासून खाद्य तेलाच्या भावात चढ-उतार सुरू आहे. यात गेल्या आठवड्यात भाववाढ होऊन ते ११८ रुपये प्रति किलोवर पोहचले होते. त्यानंतर याही आठवड्यात ही भाववाढ कायम राहत तेलाचे भाव १२० ते १३० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
शेंगदाण्याच्या तेलातही भाववाढ होऊन ते पुन्हा १५५ ते १६० रुपये प्रति किलोवर पोहचले आहे. या आठवड्यात तर सूर्यफूल तेलाच्याही भावात वाढ होऊन ते १४० ते १५० रुपये प्रति किलोवर पोहचले आहेत.
साखर अजूनही स्थिर
खाद्य तेलाला आता सणवार नसताना व मागणीही फारसी नसताना खाद्य तेलाच्या भावात वाढ होत आहे. असे असले तरी इतर किराणा साहित्याचे भाव मात्र स्थिर आहे. साखर अजूनही ३६ रुपये प्रति किलोवर स्थिर आहे.
पालेभाज्यांना भाव
गेल्या काही दिवसांपासून भाव कमी असलेल्या हिरव्या पालेभाज्यात काहीसी वाढ होत आहे. कोथिंबीर ४० रुपये किलो तर मेथीही ४० रुपये किलोवर पोहचली आहे.
कांदे खाताहेत भाव
गेल्या काही दिवसांपासून बटाट्याचे भाव कमी होऊन ते २५ ते ३० रुपये प्रति किलोवर आले आहेत. मात्र कांद्याचे भाव अजूनही ३० रुपयांच्या खाली येत नसल्याचे चित्र आहे. टमाटे १५ रुपये प्रति किलोवर पोहचले असून त्यांची आवक चांगली आहे.
खाद्य तेलाचे भाव पुन्हा वाढल्याने दर आठवड्याला आर्थिक भार वाढतच आहे. या शिवाय कोथिंबीर, हिरव्या पालेभाज्याही महाग होत आहे.
- दिलीप महाजन, ग्राहक
खाद्य तेलाच्या भावात या आठवड्यात पुन्हा वाढ झाली आहे. शेंगदाण्याच्या भावात असलेली वाढ अजूनही कायम आहे.
- सचिन छाजेड, व्यापारी
सध्या हिरव्या
पालेभाज्यांचे भाव काहीसे वाढले आहे. कोथिंबीर व मेथीची भाजी ४० रुपये प्रति किलोवर पोहचले.
- श्रीरंग वाणी, भाजीपाला विक्रेते