मानवी संवेदना समजण्यासाठी शिक्षण हाच आधार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:17+5:302021-03-29T04:11:17+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मानवी संवेदना जागृत ठेवण्याचे रहस्य सहज समजून घ्यायचे झाल्यास शिक्षण हेच अधिष्ठान मानून,त्यातील कालसापेक्ष ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : मानवी संवेदना जागृत ठेवण्याचे रहस्य सहज समजून घ्यायचे झाल्यास शिक्षण हेच अधिष्ठान मानून,त्यातील कालसापेक्ष बदल हीच आपली जबाबदारी आहे. असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ प्रा.शरच्चंद्र छापेकर यांनी शनिवारी ''शिक्षण- विचार'' या आपल्या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या प्रसंगी बोलताना व्यक्त केले.
''अविरत प्रकाशन'' जळगाव यांनी या पुस्तकाचे प्रकाशन विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत केले. यावेळी प्रकाशक जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. लेखक शरच्चंद्र छापेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये शीलसंवर्धन हा यशस्वी जीवनाचा पाया आहे. ते ओळखून शिक्षण प्रणालीत अनुकूल कालसापेक्ष बदल घडवणे ही आजची प्रमुख गरज आहे. मानवाला परिपूर्ण बनवण्याचे बनवणारे शिक्षण आज हवे आहे, त्यासाठी जीवन आणि शिक्षण यांची सुयोग्य सांगड घालायला हवी. जीवनोपयोगी शिक्षण हा आजच्या मानवी समाजाचा खरा आधार ठरू शकेल. असे शिक्षण देणारी सक्षम प्रभावी आणि चैतन्यदायी शिक्षण प्रणाली विकसित करण्याचे स्वप्न आपल्याला साकार करायचे असल्याचेही छापेकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.श्रीरंग छापेकर यांनी आभार मानले.