दहावी आणि बारावीला किती विद्यार्थी शिक्षण विभागाकडेच माहिती नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:17 AM2021-02-24T04:17:05+5:302021-02-24T04:17:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : जळगाव जिल्ह्यात दहावी आणि बारावीला किती विद्यार्थी आहेत. याची माहितीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडेच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जळगाव जिल्ह्यात दहावी आणि बारावीला किती विद्यार्थी आहेत. याची माहितीच जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडेच नसल्याचे समोर आले आहे. दरवर्षी सप्टेंबर महिन्यात यु डाईसचे काम पुर्ण केले जाते. मात्र यंदा कोरोनामुळे सप्टेंबर महिन्याच्या आधी लॉकडाऊन सुरू होते. त्यामुळे केंद्र शासनाने युडाईस संबधी मार्गदर्शक तत्वेच जारी केली नाहीत. त्यामुळे यंदा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला अद्याप हेच माहित नाही. की जिल्ह्यात दहावी आणि बारावीचे किती विद्यार्थी आहेत.
राज्यात प्रत्येक जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात युडाईसचे कामकाज पुर्ण केले जात होते. केंद्र शासनाकडून निर्देश आल्यानंतर त्याची माहिती शाळांना दिली जात होती. आणि शाळा ही माहिती पुर्ण भरून जिल्हा परिषदेकडे पाठवत होत्या. त्यात वेगवेगळे निकष असत. पण यंदा म्हणजेच सप्टेंबर २०२० च्या आधी देशभरात लॉकडाऊन होते. आणि त्यानंतर केंद्र शासनाचे कोणतेही दिशानिर्देश आलेले नाहीत. त्यामुळे आता या युडाईसवर माहितीच भरण्यात आलेली नाही.
युडाईसवर माहिती न भरण्यात आल्याने जिल्हा परिषदेला सध्या जळगाव जिल्ह्यात दहावी आणि बारावीला किती विद्यार्थी आहेत. याची माहितीच नसल्याचे समोर आले आहे.