डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे : डॉ. अनिल काकोडकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 05:32 PM2018-12-24T17:32:23+5:302018-12-24T17:37:09+5:30

जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले.

Education needs to be challenged in the digital era: Dr. Anil Kakodkar | डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे : डॉ. अनिल काकोडकर

डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे : डॉ. अनिल काकोडकर

Next
ठळक मुद्देग्रामीण बदलांसाठी ठोस उपायांची गरजचाळीसगाव येथे मराठी विज्ञान परिषदेचे अधिवेशन'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा विद्यार्थी आणि युवकांना दिला संदेश

जिजाबराव वाघ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
चाळीसगाव : जागतिक पटलावर डिजिटल तंत्रज्ञानाने मोठा भाग व्यापला असतांना सरधोपट मार्गाने चालणारे शिक्षण कालबाह्य ठरत आहे. आता डिजिटल युगाचे आव्हान पेलणारे शिक्षण हवे आहे. आजच्या शिक्षणात अमुलाग्र बदल होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी 'लोकमत'शी बोलताना केले. विद्यार्थी आणि युवकांना 'वर्ल्डक्लास एक्सलन व्हा...' असा संदेशही त्यांनी दिला.
मराठी विज्ञान परिषदेच्या अधिवेशनाच्या निमित्ताने डॉ. काकोडकर हे चाळीसगावला आले होते. मुलाखतीत त्यांनी आपली मते व्यक्त केली.
प्रश्न: आजचे शिक्षण नवी आवाहने पेलण्यास सक्षम आहे का?
डॉ. काकोडकर : माझे उत्तर 'नाही' असे आहे. हा विषय मोठा असला तरी, सरधोपटपणे चालणारे शिक्षण डिजिटल युगात कालबाह्य झाले आहे. त्यामुळे आपल्यालाही हे बदल स्विकारावे लागतील.
प्रश्न: शाळा, महाविद्यालयांचे स्वरुप बदलले पाहिजे ?
डॉ. काकोडकर : हो, निश्चितपणे. अभ्यासक्रमच नव्हे तर शिक्षण पद्धती विद्यार्थी केंद्रीत असायला हवी. जगात उलथापालथ होत असतांना हे बदल स्वीकारले नाहीत तर आपण मागे पडू.
प्रश्न: अधिवेशने, प्रदर्शने, उपक्रमांमुळे काही फायदा होतो का?
डॉ. काकोडकर : विज्ञान परिषदेचे अधिवेशन, उपक्रम याव्दारे सूचना, विचार यांना व्यासपीठ मिळते. उपक्रमही पथदर्शी असले पाहिजेत. विचारांचे आदान - प्रदान झाल्याने काहीतरी दिशादर्शक होऊ शकते.
प्रश्न: ग्रामीण भागातील बदलांसाठी काय उपाय सुचवाल ?
डॉ. अनिल काकोडकर: नव्या तंत्रज्ञानाचे बोट पकडून शेती व्यवसाचा चेहरा - मोहरा बदलता येईल. डिजिटल बदलांमुळे हे शक्य आहे. एखादे विद्यापीठ ग्रामीण भागात का नको? या प्रश्नांच्या उत्तरात ग्रामीण बदलांच्या पाऊलखुणा आहेत.
प्रश्न: अणुउर्जा निर्मितीची गती मंदावली आहे का ?
डॉ. काकोडकर: वातावरणातील बदल, कार्बनमुक्त उर्जा ही आवाहने स्विकारुन पुढे जायचे आहे. त्यामुळे ज्या गतीने या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे. ते होत नाहीए. यासाठी उर्जेचे नवे पर्याय शोधावे लागतील. रिन्युएबल एनर्जी म्हणजेच नुतनीकरणक्षम उर्जा हा त्यावर पर्याय आहे.

Web Title: Education needs to be challenged in the digital era: Dr. Anil Kakodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.