शासकीय निवासस्थान जाळणाऱ्यास शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2017 10:42 PM2017-03-14T22:42:37+5:302017-03-14T22:42:37+5:30

दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान जाळणारा

Education for those who burn the government house | शासकीय निवासस्थान जाळणाऱ्यास शिक्षा

शासकीय निवासस्थान जाळणाऱ्यास शिक्षा

Next

ऑनलाइन लोकमत

अमळनेर (जळगाव), दि. 14 - दारू पिण्यासाठी पैसे दिले नाही, म्हणून मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांचे निवासस्थान जाळणारा आरोपी कामरू रूलजी बारेला (४०) यास न्यायालयाने पाच वर्षाची शिक्षा सुनावली. हा निकाल अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश दिनेश कोठलीकर यांनी आज दिला.
कामरू बारेला हा मांडळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य सेविका कमल संभू बाविस्कर यांच्यासोबत शासकीय निवासस्थानात राहत होता. १९ एप्रिल २०१५ रोजी त्याने कमल हिच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्यानंतर त्याने निवासस्थानाला आग लावली. त्यात शासकीय निवासस्थानाचे एक लाख रूपयांचे नुकसान झाले होते. तसेच कमलच्या संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. याचा खटला अमळनेर न्यायालयात चालाला.

Web Title: Education for those who burn the government house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.