मातृभाषेतून शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 01:17 PM2019-12-22T13:17:36+5:302019-12-22T13:17:57+5:30

संदेश

Education through mother tongue is the key to the holistic development | मातृभाषेतून शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

मातृभाषेतून शिक्षण हाच सर्वांगीण विकासाचा मूलमंत्र - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

Next

प्रसाद धर्माधिकारी
नशिराबाद, ता. जळगाव : भारतीय संस्कृती सर्वश्रेष्ठ असून संस्कारयुक्त र्निव्यसनी विद्यार्थीच देश घडविण्याचे काम करू शकतील. पाश्चात्य संस्कृतीमुळे संस्कार, भाषा, भाव, विचार यात आमूलाग्र बदल होत आहे. पाश्चात्य संस्कृतीने भौतिक सुख मिळते पण संस्कार, परंपरा मिळत नाही म्हणून प्रत्येकाने मातृभाषेचा व संस्काराचा अभिमान बाळगून आपल्या पाल्यांना मातृभाषेतून शिक्षण द्यावे, असे आवाहन १०८ प. पू. अक्षयसागरजी महाराज यांनी केले आहे.
‘लोकमत’ला दिलेल्या प्रकट मुलाखतीत ते पुढे म्हणाले की, वाढती व्यसनाधीनता ही देशासाठी घातक आहे. पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण फॅशन झाले आहे. मात्र या धकाधकीच्या जीवनात आपल्या मातृभाषेसह संस्कृतीचा विसर या तरुणाईला पडलेला आहे, असे ते म्हणाले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.
प्रश्न - इंग्रजी भाषेला विरोध का?
उत्तर- इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेला विरोध नाही; परंतु तेच शिक्षणाचे माध्यम म्हणून एका विषयाच्या रूपांमध्ये शिकवले गेले पाहिजे. जी भाषा तीन महिन्यात शिकली जाते, ती भाषा शिकण्यासाठी आपल्या मुलांचे बालपण हेरून घेणे हे कितपत योग्य आहे.
प्रश्न - मातृभाषेतच शिक्षणाची आवश्यकता का आहे?
उत्तर- नवीन शोधानुसार ज्या भाषेत माता गर्भावस्थेत गर्भातील शिशुबरोबर बोलते, विचार करतो, शिशु स्वप्न पाहतो. ज्या भाषेत जन्मापासून संवाद करण्यास शकतो जर त्याच भाषेत बालपणात व कुमारअवस्थेत शिक्षण असेल तर त्याचा मानसिक विकास इतका चांगला होतो की, उच्च शिक्षणातील सर्व विषय ग्रहण करण्यास असमर्थ होतो.
जीवनात आहार-विहाराला अनन्य महत्त्व आहे. शुद्ध सात्विक आहार घ्या. फास्टफूडचे अन्न आजाराला निमंत्रण देते. संस्कारित अन्न शरीराला प्रेरणा व चैतन्य देत असते. त्यासाठी शुद्ध सात्विक आहार घ्या. मांसाहार टाळा, असे मुनीश्रींनी सांगितले.
इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसान
एखाद्या आधुनिक समृद्ध आणि शक्तिशाली राष्ट्र उभारणीत मातृभाषेची कोणती भूमिका असू शकते, याची जाणीव आमच्या नेत्यांना अजिबात नाही. ही जाणीव नसल्याने स्वातंत्र्यानंतरही आमची शिक्षणपद्धती नोकरशाही, राजकारण, प्रसिद्धीमाध्यमे, न्यायालय आणि संसदेतही इंग्रजीतच वर्चस्व आहे. इंग्रजीचे वर्चस्वामुळे देशाचे प्रचंड नुकसान झाले आहे.
मातृभाषा सोडून इतर भाषेला शिक्षणाचे माध्यम बनवले तर जास्त शक्ती आणि वेळ ती भाषा शिकण्यात खर्च होते. - मुनीश्री अक्षयसागरजी महाराज

Web Title: Education through mother tongue is the key to the holistic development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव