चोपडा येथे ललित कला केंद्रातर्फे ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ कार्यशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 11:36 PM2019-12-11T23:36:27+5:302019-12-11T23:39:26+5:30

ललित कला केंद्रात विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग’ याविषयी कार्यशाळा घेण्यात आली.

'Educational Literature Production' Workshop by Fine Arts Center at Chopda | चोपडा येथे ललित कला केंद्रातर्फे ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ कार्यशाळा

चोपडा येथे ललित कला केंद्रातर्फे ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती’ कार्यशाळा

googlenewsNext

चोपडा, जि.जळगाव : भगिनी मंडळ संचलित ललित कला केंद्रात ए.टी.डी प्रथम वर्ष, द्वितीय वर्ष, फौंडेशन तसेच जी.डी. आर्टच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी ‘शैक्षणिक साहित्य निर्मिती व उपयोग’ याविषयी १० रोजी कार्यशाळा घेण्यात आली.
या कार्यशाळेत कटपुतली बाहुलीकार आंतरराष्ट्रीय पातळीवरील सतत तीन वेळेस निवड झालेले व पारंपरिक बाहुली कठपुतळीसाठीचे एकमेव विजेता ठरलेले चोपडा येथील प्रा.दिनेश मधुकर साळुंखे हे मार्गदर्शक म्हणून होते. सतत ध्यास आणि गुरूंचे मार्गदर्शन त्यामुळे आपल्याला वाटेल ती उंची गाठता येते. पतपेढीपेक्षा आपण बँक होणेच पसंत करावे. म्हणजे आपल्या ज्ञानाचा भरपूर प्रमाणात प्रसार करता येतो. तसेच शैक्षणिक साहित्य याविषयी निर्मिती आणि त्यांचे विविध प्रकारे उपयोग यावर हसत-खेळत माहिती दिली. अतिशय अल्प खर्चात आणि सोप्या पद्धतीत आपण शैक्षणिक साहित्य कसे निर्माण करू शकतो याचे प्रात्यक्षिकही दिले. यामध्ये क्षणचित्रे घडी चित्रे, चलचित्रे, मॅजिक फोल्डर, मॅजिक बॉक्स कल्प फलक, संच त्रिमिती चित्र, डायमंड शेप इत्यादी असे अनेक साहित्य कौशल्यपूर्वक निर्मितीवर प्रकाश टाकला. तसेच प्रत्यक्षपणे विद्यार्थ्यांकडून आकृतीसह नमुनेदेखील करून घेतले आणि या शैक्षणिक साहित्याचा अध्यापनात वेळेची बचत करमणूक तसेच स्मरण शक्तीत चालना देणे आणि विद्यार्थ्यांना कसे खेळवून ठेवता येते हे स्पष्ट केले. या साहित्य निर्मितीद्वारा रोजगारही मिळू शकतो याची जाणीव करून दिली.
या उपक्रमप्रसंगी प्रा.संजय नेवे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ प्राध्यापक जी.व्ही. साळी यांनी प्रा.दिनेश साळुंखे यांचे स्वागत केले. प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी मार्गदर्शन केले. उपक्रम यशस्वीतेसाठी प्रा.सुनील बारी, प्रा.विनोद पाटील तसेच भगवान बारी, अतुल अडावदकर, प्रवीण मानकरी यांनी सहकार्य केले.

Web Title: 'Educational Literature Production' Workshop by Fine Arts Center at Chopda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.